जम्मूमध्ये बॉम्बस्फोट; एक तरुण ठार, ३२ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:44 AM2019-03-08T05:44:10+5:302019-03-08T05:44:20+5:30
संशयित दहशतवाद्यांनी गुरुवारी जम्मू शहरातील एका बसस्थानकावर केलेल्या हातबॉम्बच्या (ग्रेनेड) हल्ल्यात एक १७ वर्षांचा मुलगा ठार झाला, तर ३२ जण जखमी झाले.
जम्मू : संशयित दहशतवाद्यांनी गुरुवारी जम्मू शहरातील एका बसस्थानकावर केलेल्या हातबॉम्बच्या (ग्रेनेड) हल्ल्यात एक १७ वर्षांचा मुलगा ठार झाला, तर ३२ जण जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून, यापैकी दोघांवर तातडीने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांना वाचविले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
जखमींमध्ये काश्मीरचे ११, बिहारचे दोन आणि छत्तीसगड आणि हरियाणातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. या प्रकरणी एका इसमास अटक करण्यात आली आहे. मागच्या वर्षातील मे महिन्यानंतर जम्मू बसस्थानकात दहशतवाद्यांनी केलेला हा तिसरा बॉम्बहल्ला आहे.
जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी सांगितले की, कोणीतरी बसस्थानक परिसरात दुपारच्या सुमाराला डागलेल्या बॉम्बचा स्फोट झाला.