केरळमध्ये संघाच्या कार्यालयावर फेकला बॉम्ब, 3 कार्यकर्ते जखमी

By admin | Published: March 3, 2017 04:04 AM2017-03-03T04:04:20+5:302017-03-03T04:16:48+5:30

केरळमधील कलाच्चीमध्ये स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी बॉम्ब फेकल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Bomb blasted at party office in Kerala, 3 activists injured | केरळमध्ये संघाच्या कार्यालयावर फेकला बॉम्ब, 3 कार्यकर्ते जखमी

केरळमध्ये संघाच्या कार्यालयावर फेकला बॉम्ब, 3 कार्यकर्ते जखमी

Next
ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम,  दि. 3 - केरळमधील कलाच्चीमध्ये स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संघाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना कोझिकोडमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र संघाच्या कार्यालयावर बॉम्ब कोणी फेकला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

विशेष म्हणजे केरळमध्ये डावे आणि संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाच्या अनेक घटना घडत असतात. या प्रकारानंतर संघ विचारक राकेश सिन्हा यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची फूस असल्यामुळेच डाव्यांकडून हिंसात्मक कारवाई केली जाते. त्यानंतर सिन्हा यांनी केंद्रीय गृहमंत्रालयानं केरळ सरकारवर सल्लागार समिती नेमावी, अशी मागणी केली आहे. तसेच केरळमधील लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केरळचा दौरा करावा, असंही ते म्हणाले आहेत.
(केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणा-याला 1 कोटी देईन - RSS नेता)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कुंदन चंद्रावत यांनी जो कोणी केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा शिरच्छेद करेल त्याला 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मात्र स्वयंसेवक संघाकडून कुंदन चंद्रावत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. तसेच संघ कधीच हिंसात्मक कारवाईचे समर्थन करणार नसल्याचंही संघानं स्पष्ट केलं आहे. 
 

Web Title: Bomb blasted at party office in Kerala, 3 activists injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.