बिहारमध्ये रेल्वे ट्रॅकवर बॉम्ब स्फोट, मोठी दुर्घटना टळली
By admin | Published: February 6, 2017 06:02 PM2017-02-06T18:02:12+5:302017-02-06T18:36:43+5:30
बक्सर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रूळावर दुपारी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास बॉम्ब स्फोट, स्फोट झाला त्यावेळी वाराणसी-सेलदाह अप्पर इंडिया एक्सप्रेस
Next
ऑनलाइन लोकमत
बिहार, दि. 6 - येथील बक्सर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रूळावर आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास बॉम्ब स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. कारण स्फोट झाला त्यावेळी वाराणसी-सेलदाह अप्पर इंडिया एक्सप्रेस तेथून जात होती. या प्रकरणी रेल्वेकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
स्फोटाचा आवाज ऐकून मोटारमनने ट्रेन थांबवली होती. सुरक्षा कारणास्तव सव्वा दोन वाजेपर्यंत ट्रेनला थांबवण्यात आलं होतं अशी माहिती पूर्व मध्य रेल्वेचे प्रवक्ता ए.के.रजक यांनी दिली. यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.
यापुर्वीही बिहारमध्ये मोतिहारी जिल्ह्यातील घोडहसन येथे रेल्वे ट्रॅकवर बॉम्ब स्फोट झाला होता. त्यावेळी याचा संबंध दहशतवादाशी निघाला होता.
Bihar: At 1210 hrs, bomb blast took place on railway track near Buxar station in Mughalsarai-Patna section;No harm reported;Enquiry ordered. pic.twitter.com/ReU7MNkO4Z
— ANI (@ANI_news) February 6, 2017