महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब

By admin | Published: January 30, 2016 04:21 AM2016-01-30T04:21:45+5:302016-01-30T04:21:45+5:30

देशातील काही भागात अलीकडेच संशयित दहशतवाद्यांची धरपकड झाली असताना उत्तर प्रदेशात गुरुवारी रात्री एका रेल्वे प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे महानगरी एक्स्प्रेसचे डबे टाईमबॉम्बने

Bomb in the Mahanagri Express | महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब

महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब

Next

चित्रकूट : देशातील काही भागात अलीकडेच संशयित दहशतवाद्यांची धरपकड झाली असताना उत्तर प्रदेशात गुरुवारी रात्री एका रेल्वे प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे महानगरी एक्स्प्रेसचे डबे टाईमबॉम्बने उडविण्याचा कट उधळण्यात आला.
वाराणसीहून मुंबईला जात असलेल्या महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील शौचालयातून हा शक्तिशाली टाईम बॉम्ब जप्त करण्यात आला. हा बॉम्ब एवढा शक्तिशाली होता की तो जेथे निष्क्रिय करण्यात आला, तेथे चार भलेमोठे खड्डे पडले. रेल्वेत या बॉम्बचा स्फोट झाला असता तर अनेक डबे उद्ध्वस्त झाले असते. रेल्वेचे अपर पोलीस महासंचालक सी.एस. मीना यांनी हे दहशतवाद्यांचे कृत्य असण्याची शक्यता फेटाळलेली नाही. या घटनेच्या तपासासाठी राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे (एनआयए) पथक घटनास्थळी पोहोचले असून रेल्वे पोलीस, विशेष कृती दल आणि दहशतवादविरोधी पथकानेही चौकशी सुरू केली आहे.
या बॉम्बजवळ इंग्रजीत लिहिलेले एक पत्रही सापडले. परंतु त्यातील मजकूर सांगण्यास पोलीस महासंचालक मीना यांनी नकार दिला. वाराणसी ते माणिकपूरदरम्यान महानगरी एक्स्प्रेसचे चार थांबे आहेत. यापैकी एका रेल्वेस्थानकावर हा बॉम्ब पेरण्यात आला असावा असा कयास आहे. (वृत्तसंस्था)


प्रवाशाच्या सतर्कतेने अनर्थ टळला
महानगरी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचच्या शौचालयात गुरुवारी रात्री एका प्रवाशाने हिरव्या रंगात गुंडाळलेली संशयास्पद वस्तू बघितली. त्याने लगेच रेल्वेतील सुरक्षा दलाच्या जवानांना याची सूचना दिली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन रेल्वेगाडी माणिकपूर रेल्वे स्थानकावर थांबविली. संशयित वस्तूची पाहणी केली असता तो एक टाईम बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. त्यात घड्याळ, तार आणि उपकरण जोडण्यात आले होते. हा बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला.

दोन संशयित ताब्यात... महाबोधी एक्स्प्रेसमध्येही बॉम्बची सूचना मिळाल्याने रेल्वे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. तडकाफडकी ही गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. तसेच कुर्ला एक्स्प्रेसचीही तपासणी करण्यात आली. मात्र त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यानंतर त्या दोन्ही गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या, गुरूवारी महाबोधी एक्स्प्रेसमधून दोन संशयितांना ताब्यातही घेण्यात आले. ते दोघे बिहारचे आहेत.

Web Title: Bomb in the Mahanagri Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.