दिल्ली-जयपूरवर ४५ मिनिटे घिरट्या घालत होतं बॉम्ब असलेलं इराणी विमान, सुखोईने असा टाळला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 02:26 PM2022-10-03T14:26:48+5:302022-10-03T14:32:49+5:30

Bomb Threat In Iranian plane: भारताच्या हवाई हद्दीतून जात असलेल्या एका इराणी विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणामध्ये खळबळ उडाली होती. मात्र भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी या विमानाला भारतात उतरण्याची परवानगी दिली नाही.  

Bomb Threat In Iranian plane: An Iranian plane carrying a bomb was hovering over Delhi-Jaipur for 45 minutes, Sukhoi avoided such a threat | दिल्ली-जयपूरवर ४५ मिनिटे घिरट्या घालत होतं बॉम्ब असलेलं इराणी विमान, सुखोईने असा टाळला धोका

दिल्ली-जयपूरवर ४५ मिनिटे घिरट्या घालत होतं बॉम्ब असलेलं इराणी विमान, सुखोईने असा टाळला धोका

Next

नवी दिल्ली - भारताच्या हवाई हद्दीतून जात असलेल्या एका इराणीविमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणामध्ये खळबळ उडाली होती. हे विमानइराणवरून चीनकडे जात होते. दरम्यान, या विमानाने दिल्लीमध्ये आपातकालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली होती. विमानामध्ये बॉम्ब असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी या विमानाला भारतात उतरण्याची परवानगी दिली नाही.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इराणमधील तेहरान येथून चीनमधील ग्वांग्झू शहराच्या दिशेने हे विमान जात होते. तेवढ्यात भारतीय वेळेनुसार ९ वाजून २० मिनिटांनी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरील अधिकाऱ्यांना एक विमान आपातकालीन परिस्थितीत उतरण्याची परवानगी मागत असल्याची माहिती मिळाली. विमानामधील क्रू ने दिल्ली विमानतळावरील एटीसीशी संपर्क साधून विमानात बॉम्ब असल्याचे सांगत आपातकालीन लँडिंगची परवानगी मागितली. मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कुठल्याही प्रकारचा धोका नको म्हणून विमानाला येथे उतरण्याची परवानगी नाकारली.

त्यानंतर हे विमान जयपूरच्या दिशेने गेले. तिथेही विमानाला उतरण्याची परवानगी नाकारली. या संपूर्ण प्रकारादरम्यान, सुमाने ४५ मिनिटे भारतीय हवाई हद्दीत उडत होते. त्यानंतर आता या विमानाला चीनमधील ग्वांग्झूच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.

दरम्यान, विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर जोधपूर आणि पंजाबमधील हवाई दलाच्या विमानांना अलर्ट करण्यात आले. काही मिनिटांमध्येच इराणच्या या विमनाला भारतीय हवाई दलाच्या सुखोई एमकेआय विमानांनी आकाशात घेरले. एवढंच नाही तर ग्राऊंड फोर्सलाही अॅक्टिव्हेट करण्यात आले.

या विमानाने दिल्ली किंवा जयपूरमध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये म्हणून संपूर्ण ४५ मिनिटांपर्यंत सुखोईच्या विमानांनी या विमानाला घेरून ठेवले. संपूर्ण जगातील विमानांवर नजर ठेवणारी संस्छा फ्लाइटरडार२४ने दिलेल्या माहितीनुसार इराणचं हे विमान जयपूरच्या एअरस्पेसमध्ये आपली उंची कमी करत होते. मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांनी परवानगी नाकारल्यानंतर ते ग्वांग्झूकडे रवाना झाले.  

Web Title: Bomb Threat In Iranian plane: An Iranian plane carrying a bomb was hovering over Delhi-Jaipur for 45 minutes, Sukhoi avoided such a threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.