७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 05:48 AM2024-10-20T05:48:54+5:302024-10-20T05:50:12+5:30

Bomb Threat, Airplane Emergency landing: गेल्या २४ तासांत विमानांबाबत दिल्या गेलेल्या सर्व धमक्या खोट्या निघाल्या

Bomb threat on over 70 planes Emergency landing of 30 planes in 24 hours, 80 crore hit | ७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका

७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्याच्या घटनात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, गेल्या आठवडाभरात ७० विमानांत बाॅम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली. त्यापैकी ३० विमानांबाबत धमकी गेल्या २४ तासांत धमकी प्राप्त झाली. या सर्व धमक्या खोट्या निघाल्या. मात्र, ३० पेक्षा जास्त विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले असून धमक्यांच्या प्रकारामुळे सुमारे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शनिवारी धमकी प्राप्त होणाऱ्या कंपन्यांत एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर, विस्तारा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअर या विमान कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी सहा विमानांचे मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बहुतांश धमक्या या सोशल मीडियावरून देण्यात आल्या आहेत. यापैकी काही प्रकरणांत आरोपींना अटकही करण्यात आली आहे. 

बीसीएएसची बैठक

नवी दिल्ली: विमानांत बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) शनिवारी विमान वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. काही कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जातीने बैठकीला हजर होते. बीसीएएसचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सांगितले की, भारतीय आकाश पूर्णत: सुरक्षित आहे. सध्याचा प्रोटोकॉल मजबूत असून काटेकाेरपणे अमलात आणला जात आहे. 

Web Title: Bomb threat on over 70 planes Emergency landing of 30 planes in 24 hours, 80 crore hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.