आता 85 विमानांना बॉम्बची धमकी, 20 एअर इंडिया अन् 25 आकासा विमानांचा समावेश...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 03:38 PM2024-10-24T15:38:36+5:302024-10-24T15:38:50+5:30

Bomb Threat to Airplanes : गेल्या काही दिवसांपासून विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्यांच्या घटना वाढल्या आहेत.

Bomb Threat to Airplanes: bomb threat to 85 planes at the same time, including 20 Air India and 25 Akasa planes | आता 85 विमानांना बॉम्बची धमकी, 20 एअर इंडिया अन् 25 आकासा विमानांचा समावेश...

आता 85 विमानांना बॉम्बची धमकी, 20 एअर इंडिया अन् 25 आकासा विमानांचा समावेश...

Bomb Threat to Airplanes : देशात प्रवासी विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. आता आज 85 विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये एअर इंडियाच्या 20, इंडिगोच्या 20, विस्ताराच्या 20 आणि आकासा एअरच्या 25 विमानांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून शेकडो विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या असून, यामुळे 200 कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, या घटनांमुळे सरकार अलर्ट मोडवर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी पोलिसांनी 90 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे आठ दिवसांत आठ स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत. आता ज्या विमानांना धमक्या आल्या आहेत, त्यात आकासा, एअर इंडिया, इंडिगो आणि विस्तारा या विमानांचा समावेश आहे. ही उड्डाणे दिल्लीहून विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर चालतात. या प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पहिले धमकीचे प्रकरण 16 ऑक्टोबर रोजी बंगळुरुला जाणाऱ्या आकासा फ्लाइटशी संबंधित आहे. एसएमएसद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या विमानात 180 हून अधिक प्रवासी होते. धमकीमुळे विमानाला दिल्लीला परतावे लागले. दुसऱ्या दिवशी, पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला पत्र लिहून धमकीचे संदेश पोस्ट करणाऱ्या खात्याचा तपशील मागवला.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या विविध टीम्स विमानांना मिळणाऱ्या धोक्यांसंदर्भात X आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून आहेत. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत, 170 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. दरम्यान, सरकार विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्यांना तोंड देण्यासाठी कायदेशीर कारवाईची योजना आखत आहे.

Web Title: Bomb Threat to Airplanes: bomb threat to 85 planes at the same time, including 20 Air India and 25 Akasa planes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.