3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 05:26 PM2024-10-16T17:26:05+5:302024-10-16T17:26:20+5:30

गृह मंत्रालयाने आज MoCA आणि BCAS सोबत या धमक्यांबाबत चर्चा केली.

Bomb threats to 12 Indian planes in 3 days; Now Home Ministry will take strict action... | 3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

Bomb Threat To Indian Airplans : देशातील विमान वाहतुकीबाबत धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांत डझनभर विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. मात्र, चौकशीत सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घातले असून, अशा खोट्या धमक्यांबाबत कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. बुधवारी गृह मंत्रालयाने एमओसीए आणि बीसीएएसशी या धमक्यांवर चर्चाही केली.

सरकारी सूत्रांनुसार, बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीद्वारे परिस्थितीवर विचारमंथन केले जात आहे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसह एमओसीएने बनावट कॉलर ओळखण्याचा आणि त्यांना “नो-फ्लाय लिस्ट” मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

धमक्या वाढल्या...
बुधवारीदेखील दोन फ्लाइट्स (आकासा एअर आणि इंडिगो) ना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. पण, नंतर या धमक्या बनावट असल्याचे समजले. गेल्या तीन दिवसांतील ही 12वी घटना आहे. यापूर्वी, सोशल मीडियावर बॉम्बची बनावट धमकी मिळाल्यानंतर मुंबईहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान अहमदाबादला वळवण्यात आले होते. हे विमान मंगळवारी रात्री सुमारे 200 प्रवासी आणि कर्मचारी घेऊन मुंबईहून निघाले होते. 

3 दिवसांत 12 विमानांना धमकी 
मंगळवारी 7 फ्लाइट्सना बॉम्बच्या खोट्या धमक्या मिळाल्या होत्या. यामध्ये दिल्ली-शिकागो एअर इंडिया फ्लाइट, जयपूर-बंगळुरू एअर इंडिया एक्स्प्रेस, दम्मम-लखनऊ इंडिगो फ्लाइट, दरभंगा-मुंबई स्पाईसजेट फ्लाइट, सिलीगुडी-बंगळुरू आकासा एअर फ्लाइट, अलायन्स एअर अमृतसर-डेहराडून-दिल्ली फ्लाइट आणि एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटचा समावेश आहे. यापूर्वी सोमवारी दोन इंडिगो फ्लाइट आणि एअर इंडियाच्या एका फ्लाइटलाही अशाच प्रकारच्या खोट्या धमक्या मिळाल्या होत्या. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) सायबर सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांसोबत धमक्यांमागील गुन्हेगारांचा शोध घेत आहे.

Web Title: Bomb threats to 12 Indian planes in 3 days; Now Home Ministry will take strict action...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.