भाजपा खासदाराच्या घरावर बॉम्बहल्ला, अज्ञातांकडून गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:25 PM2019-07-25T15:25:14+5:302019-07-25T15:44:00+5:30
लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली राजकीय लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
कोलकाता - लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्येभाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली राजकीय लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या विवादाचे पर्यावसान हिंसाचारात होत असून, नुकत्याच झालेल्या ताजा घटनेत उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजपा खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी अर्जुन सिंह यांच्य घरावर बॉम्बहल्ला केला आहे. तसेच हल्लेखोरांनी सिंह यांच्या घराच्या दिशेने गोळीबारही केला.
बेराकपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या अर्जुन सिंह यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. तसेच घराच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला.' दरम्यान या हल्ल्याच्या घटनेनंतर खासदार अर्जुन सिंह यांच्या कुटुंबीयांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
West Bengal: Unidentified miscreants hurled bomb at the residence of BJP MP from Barrackpore, Arjun Singh, and fired bullets outside it under Jagatdal police station limits in North 24 Parganas district, last night. A complaint has been registered with the police. pic.twitter.com/8GjZX8UnaT
— ANI (@ANI) July 25, 2019
दरम्यान, हल्ल्याच्या घटनेनंतर उत्तर 24 परगणा जिल्ह्यात जगतदल ठाण्याचजवळ असलेल्या अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच अर्जुन सिंह यांचा मुलगा सौरभ सिंह यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.
या जीवघेण्या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप अर्जुन सिंग यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर भाजपाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधाच जोरदार आंदोलन पुकारले आहे.
दरम्यान, हा गोळीबार झाला तेव्हा भाजपा खासदार अर्जुन सिंह हे घरी नव्हते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते दिल्ली येथे गेलेले आहेत. दरम्यान अऱ्जुन सिंह यांच्या घराबाहेरक आरएएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.