पाटील यांच्या जीवनकार्यावर पुस्तक

By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:03+5:302015-09-04T22:45:03+5:30

नाशिक : कॉ़ एल़ एम़ पाटील हे अत्यंत उदारमतवादी व्यक्तिमत्त्व होते़ आपले संपूर्ण जीवन दीपस्तंभाप्रमाणे जगणारे पाटील यांनी इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे़ त्यामुळे त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाची निर्मिती केली जाणार आहे़ तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाच्या एका शाळेला त्यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी दिले़ रावसाहेब थोरात सभागृहात कॉ़ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत त्या बोलत होत्या़

Book on the life of Patil | पाटील यांच्या जीवनकार्यावर पुस्तक

पाटील यांच्या जीवनकार्यावर पुस्तक

Next
शिक : कॉ़ एल़ एम़ पाटील हे अत्यंत उदारमतवादी व्यक्तिमत्त्व होते़ आपले संपूर्ण जीवन दीपस्तंभाप्रमाणे जगणारे पाटील यांनी इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे़ त्यामुळे त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाची निर्मिती केली जाणार आहे़ तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाच्या एका शाळेला त्यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी दिले़ रावसाहेब थोरात सभागृहात कॉ़ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत त्या बोलत होत्या़
यावेळी उपस्थित मान्यवर ॲड़ दौलतराव घुमरे यांनी एल़ एम़ पाटील यांच्या जीवनकार्यावर पुस्तक तसेच मविप्रच्या शाळेला त्यांचे नाव देण्याची सूचना केली होती़ तसेच या पुस्तक निर्मितीसाठी ज्यांच्याकडे त्यांचे फोटो, आठवणी असतील ते देण्याचे आवाहन केले़ आमदार राहुल अहेर यांनी लखामामांनी तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही, संपूर्ण आयुष्य ते नीतिमूल्ये जपत जगल्याचे संागितले़ माजी खासदार व मविप्रचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांनी पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला़
यावेळी ॲड़मनीष बस्ते, कल्पना कराडे, राजू देसले, राजू नाईक, डॉ़ संजय जाधव, सुरेश पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Book on the life of Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.