गुजरात शिक्षण मंडळाचा नवा पराक्रम, पुस्तकात "रोजा"चा उल्लेख संसर्गजन्य आजार

By admin | Published: July 11, 2017 10:42 AM2017-07-11T10:42:32+5:302017-07-11T11:01:39+5:30

रमजानच्या महिन्यात केला जाणारा उपवास "रोजा" म्हणजे एक संसर्गजन्य आजार आहे, असं गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाने म्हंटलं आहे.

The book "Rosa" is mentioned in the book 'Gujarat Shikshan Mandal's new feat,' a communicable disease | गुजरात शिक्षण मंडळाचा नवा पराक्रम, पुस्तकात "रोजा"चा उल्लेख संसर्गजन्य आजार

गुजरात शिक्षण मंडळाचा नवा पराक्रम, पुस्तकात "रोजा"चा उल्लेख संसर्गजन्य आजार

Next

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि.11- गुजरात शिक्षण मंडळाचा नवा पराक्रम समोर आला आहे. याआधी शिक्षण मंडळाकडून एका पुस्तकात येशू ख्रिस्ताचा उल्लेख "सैतान" करण्यात आला होता. त्यावरून बराच वादही झाला. आता रमजानच्या महिन्यात केला जाणारा उपवास "रोजा" म्हणजे एक संसर्गजन्य आजार आहे, असं गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाने म्हंटलं आहे. बोर्डाच्या इयत्ता चौथीच्या हिंदीच्या पुस्तकात असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ही प्रिंटींग मिस्टेक असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे. "हैजा"च्या जागी "रोजा" हा शब्द चुकून छापला गेला असल्याचं बोर्डाने म्हंटलं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
 
लेखक प्रेमचंद यांनी लिहिलेली  "ईदगाह" नावाची कथा इयत्ता चौथीच्या हिंदीच्या पुस्तकात पान क्र. १३ वर आहे. त्या कथेच्या खाली कथेतील काही शब्दांचे अर्थ देण्यात आले आहेत. त्यात "रोजा"- एक संक्रामक रोग जिसमे दस्त और काई आती है. (म्हणजेच ज्यात जुलाब आणि उलट्या होतात असा संसर्गजन्य आजार) असा शब्दाचा अर्थ देण्यात आला आहे. 
गुजरात राज्य शालेय पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष नितीन पेठाणी यांनी ही छपाईची चूक असल्याचं सांगितलं आहे. ही छपाईची चूक आहे. "हैजा" असा शब्द हवा होता, त्याऐवजी "रोजा" हा शब्द चुकून छापला गेला आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.  खरंतर २०१५ पासून हे पुस्तक चौथीच्या अभ्यासात आहे. पण आधीच्या आवृत्त्यांमध्ये ही चूक नव्हती. २०१७ ला ज्या पुस्तकांची छपाई झाली त्यात ही चूक झालेली आहे.
आणखी वाचा
 

अमरनाथ हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश

प्रत्येक काश्मिरीची मान शरमेने खाली गेली आहे - मेहबूबा मुफ्तीअमरनाथ हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा, पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल मास्टरमाईंड

हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील कथेत झालेली चूक ही प्रिटिंग मिस्टेक आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. असंही पेठाणी म्हणाले आहेत.

"मी स्वतः पुस्तक पाहिलं आहे. पुस्तकात झालेली चूक ही गंभीर असून, ही चूक नेमकी कशी झाली, हे पडताळण्यासाठी आम्ही समिती नियुक्त करणार आहोत, असं गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी सांगितलं. तसंच या चुकीत दोषी असलेल्या प्रुफ रिडर किंवा डेटा एन्ट्री ऑपरेटरला शिक्षा दिली जाइल, असंही ते म्हणाले आहेत. 

 

Web Title: The book "Rosa" is mentioned in the book 'Gujarat Shikshan Mandal's new feat,' a communicable disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.