पहिल्यांदाच भारतीय लेखिकेचा सन्मान, कादंबरीला 'बुकर' पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:02 PM2022-05-28T12:02:52+5:302022-05-28T12:03:40+5:30
पहिल्यांदाच भारतीय लेखिकेचा सन्मान
लंडन : भारतीय लेखिका गीतांजली श्री यांच्या ‘टाेम्ब ऑफ सँड’ या हिंदी कादंबरीला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. एखाद्या हिंदी कादंबरीला, तसेच तिच्या भारतीय लेखिकेला बुकर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.
गीतांजली श्री यांनी ‘रेत समाधी’ ही हिंदी कादंबरी लिहिली होती, त्याचा ‘टाेम्ब ऑफ सँड’ या नावाने डेजी रॉकवेल यांनी इंग्रजीत अनुवाद केला . या कादंबरीत ८० वर्षांच्या एका वृद्धेची कहाणी वाचायला मिळते. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाले. त्यावेळी आलेले अनुभव तिच्या मनात घर करून असतात. ही वयोवृद्ध महिला पाकिस्तानमध्ये जाते तेव्हा या फाळणीच्या मुळाशी जायचा प्रयत्न करते, असा कादंबरीचा आशय आहे.
लंडनमध्ये झालेल्या समारंभात गीतांजली श्री यांना बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले. ५० हजार पौंड रकमेचा हा बुकर पुरस्कार गीतांजली श्री व त्यांच्या हिंदी कादंबरीच्या अनुवादक डेजी रॉकवेल यांना विभागून देण्यात आ. गीतांजली मूळच्या दिल्लीच्या रहिवासी आहेत.
‘टोम्ब अँड सँड’ हे पुस्तक लिहिण्यामागे हिंदीसारख्या समृद्ध भाषेची मोठी परंपरा आहे. दक्षिण आशियातील अनेक भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्यकृती आहेत. या भाषांतील साहित्य जगभर पोहोचले तर त्यातून विचारांचे उत्तम आदानप्रदान होईल.
- गीतांजली श्री
(वृत्तसंस्था)