बुकी अन् पंटरांचा सुकाळ, 60 हजार काेटींसाठी सट्टेबाज मैदानात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 06:33 AM2022-03-27T06:33:16+5:302022-03-27T06:34:45+5:30

कुठल्यातरी पॉश वसाहतीतल्या फ्लॅटवर पडणारा पोलिसांचा छापा.

Bookie and Punter's good luck, in the betting ground for 60 thousand girls ... | बुकी अन् पंटरांचा सुकाळ, 60 हजार काेटींसाठी सट्टेबाज मैदानात...

बुकी अन् पंटरांचा सुकाळ, 60 हजार काेटींसाठी सट्टेबाज मैदानात...

Next

केटची मॅच मैदानावर सुरू असताना त्याचवेळी त्यामागे चालणारा सट्टेबाजीचा खेळ म्हणजे अब्जावधींची उलाढाल. कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामागे १० ते २० हजार कोटींची उलाढाल ही ठरलेलीच. परंतु, आयपीएलची तुफान लोकप्रियता लक्षात घेत, त्यावरचा सट्टाबाजार म्हणजे बुकी आणि पंटरांचा तर सुकाळच. म्हणूनच गेल्या आयपीएल सामन्यावरील सट्टेबाजी ४० हजार कोटींवर गेली होती. यंदा लॉकडाऊन उठून वातावरण मोकळं झाल्याने ही उलाढाल ६० हजार कोटींवर पोहोचू शकेल, अशी खुशीची गाजरं सध्या बुकी खात आहेत. 

कुठल्यातरी पॉश वसाहतीतल्या फ्लॅटवर पडणारा पोलिसांचा छापा. तेथे जप्त होणारे पोतीभर मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, लॅन्डलाईन फोन, किरकोळ हिशेब लिहिलेल्या चिठ्ठ्याचपाट्या आणि लाखभराची रोकड... कुठल्याही बुकीच्या अड्डयावरील छाप्यात दिसणारं हे दृश्य. या कारवाईत दोन - चारजण गजाआड होतात आणि काही दिवसांनी सुटतातही. मागे राहते ती सट्टेबाजीची चर्चा. आयपीएलच्या निमित्ताने सट्टाबाजारने आपलं अंग झटकत यंत्रणा सज्ज केली आहे.  मानवातील जुगारी प्रवृत्ती अगदी महाभारतातील द्युतापासून पाहायला मिळते. जेथे अनिश्चितता अधिक तितकी जुगार खेळण्याची हौस दांडगी. म्हणूनच पावसाळ्यात ‘आज पाऊस पडेल का’, यावरही जुगार खेळला जायचा. कधीकाळी कॉटन मार्केटच्या दरावर खेळला जाणारा जुगार नंतर मटक्यापर्यंत येऊन ठेपला. आता या सगळ्याला उलाढालीत मागे टाकलंय ते क्रिकेटसारख्या अनिश्चित आणि थरारक खेळावरील सट्ट्याने. अगदी मॅचच्या पहिल्या बॉलपासून ते निकाल लागेपर्यंत बेटींग लागतच असतं. आयपीएल मॅचवर सट्टा घेणारा अगदी तळाचा बुकीही ३०० ते ५०० पंटरांकडून प्रत्येकी किमान लाखभर रुपये बेट घेतो. हे जाळं गल्लोगल्ली पसरलंय. देशातल्या प्रत्येक शहरात, गावात बुकी पसरलेले आहेत. हे केवळ देशापुरतं मर्यादित नसून, वेगवेगळ्या देशांत हे नेटवर्क पसरलेलं आहे. एका दिवसात हजारो कोटी इकडचे तिकडे करणाऱ्या या अदृश्य नेटवर्कमागे अंडरवर्ल्डचाही मजबूत पंजा आहे. दुबई, इंग्लंड ही या बाजाराची देशाबाहेरील महत्त्वाची केंद्र. 

अलीकडच्या काही वर्षांत पसरलेल्या इंटरनेट, ॲप आदी तंत्रज्ञानाने परंपरागत सट्टेबाजाराचं स्वरूप अगदी ई-सट्टाबाजार म्हणावं इतकं पालटून टाकलंय. अनेक ऑनलाईन साईटवर आपलं अकाऊंट ओपन करून कुणालाही सट्टा खेळण्याची तलफ भागवता येते. मागील आयपीएल सुरू असताना जयपूर येथील छाप्यात बुकींनी प्रसिद्ध मंदिरांच्या नावाने तब्बल ३० वेगवेगळे व्हाॅटसॲप ग्रुप स्थापन करून जोरदार बेटींग घेतल्याचं आढळलं होतं. एक लाख म्हणजे एक रूपया, ५० हजार म्हणजे अठन्नी आणि २५ हजार म्हणजे चवन्नी असे उल्लेख त्यात हाेते.  

फॅन्सी सट्टा
पंटरांकडून कधी पूर्ण सामन्याच्या निकालावर बेटींग घेतलं जातं. त्याचप्रमाणे अर्धा सामना, एक षटक अथवा एका सेशनवर (एक सेशन म्हणजे दहा षटकं) तर कधी प्रत्येक षटकात किती धावा काढल्या जाणार यावर तर कधी एका-एका बॉलवर बेटींग घेतलं जातं. याला फॅन्सी सट्टा म्हणूनही ओळखलं जातं. 

मागील आयपीएल स्पर्धेत मे महिन्यात खेळाडूंना काेरोनाची लागण होऊन स्पर्धा स्थगित झाली होती. सप्टेंबर महिन्यात ती सुरू झाली. या अडथळ्यामुळे सट्टाबाजाराच्या नेटवर्कला धक्का बसला. तरीही एकूण उलाढाल ४० हजार कोटींच्या घरात गेली होती. यंदा कोरोनाचे मळभ हटल्याने ही उलाढाल यावर्षी उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे. 
 

Web Title: Bookie and Punter's good luck, in the betting ground for 60 thousand girls ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.