वंदे भारत मिशन : देशांतर्गत विमान प्रवासासाठी बुकिंग सुरू, पण अटी लागू; फक्त 'यांना'च मिळणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 07:37 PM2020-05-14T19:37:12+5:302020-05-14T19:50:05+5:30
वंदे भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात 31 देशांतून 30,000 भारतीय स्वदेशात परततील. यासाठी 16 मे ते 22 मेदरम्यान 149 विमान उड्डाणे होतील.
नवी दिल्ली : देशांतर्गत विमान सेवा 18 मेपासून सुरू होत आहे. मात्र, सामान्य प्रवाशांसाठी ही सुविधा नसेल. यासंदर्भात एअर इंडियाने एन निवेदनही जारी केले आहे. यात स्पष्ट करण्यात आले आहे, की परदेशात अडकलेले जे लोक देशात परत येत आहेत. केवळ त्यांच्यासाठीच देशांतर्गत विमानसेवा चालवली जाईल. ही उड्डाणे कुण्याही सामान्य प्रवाशांसाठी नसतील. तिकिटांचे बुकींग आज (गुरुवार) सायंकाळी 5:00 वाजल्यापासून सुरू झाले आहे.
परदेशात अडकलेले भारतीय नागरिक देशात आल्यानंतर, त्यांच्या समोर घरी जाण्याचा प्रश्न उभा राहत आहे. यामुळे. त्यांच्यासाठी देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे.
16 मेपासून वंदे भारत मिशनचा दुसरा टप्पा -
वंदे भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात 31 देशांतून 30,000 भारतीय स्वदेशात परततील. यासाठी 16 मे ते 22 मेदरम्यान 149 विमान उड्डाणे होतील. वंदे भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात एयर इंडिया आणि सहकारी एयर इंडिया एक्सप्रेसने 7 मेपासून 14 मेपर्यंत 64 उड्डाणे केली आहेत. यात 12 देशांमधून 14,800 भारतीयांना देशात आणण्यात आले. यासाठी त्यांना प्रवासाचे शुल्कही आकारले गेले.
भारतातून काही मोजक्या उड्डाणांसाठी बुकिंग सुरू -
एअर इंडियाने भारतातून अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रँकफर्ट, पॅरिस आणि सिंगापूरसाठी काही मोजक्या उड्डाणांसाठी गुरुवारी सायंकाळपासून बुकिंग रुरू केली आहे. या विमानातून केवळ वरील देशांच्या नागरिकांनाच प्रवास करता येईल. मात्र, काही उड्डाणांत त्या देशांत काही वेळासाठी वैध व्हिसा असणाऱ्यांनाही प्रवासाची परवानगी असेल. एअर इंडियाने यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : बिल गेट्स यांचा धक्कादायक खुलासा; 2016मध्येच ट्रम्प यांना दिला होता महामारीचा इशारा
FlyAI: Reservation for travel from India to select destinations in USA,UK,Australia & to Frankfurt, Paris & Singapore will commence from 1700 hrs on 14th May 20 on https://t.co/T1SVjRluZv You may also call on 0124 2641407/02026231407/18602331407 or do a live chat via our website
— Air India (@airindiain) May 14, 2020
आणखी वाचा - CoronaVirus News : संशोधकांचा दावा; आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा