सीमा भागात होणार आता अधिक बारकाईने टेहळणी; १०,५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 04:46 AM2020-12-20T04:46:56+5:302020-12-20T06:57:34+5:30

Border areas : सध्या भारतीय बनावटीचे नेत्र व इस्रायली-रशियन बनावटीची फाल्कन विमाने हे काम करीत आहेत. 

Border areas will now be closely monitored; 10,500 crore project sanctioned | सीमा भागात होणार आता अधिक बारकाईने टेहळणी; १०,५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

सीमा भागात होणार आता अधिक बारकाईने टेहळणी; १०,५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

googlenewsNext

नवी दिल्ली :  भारताच्या संरक्षण दलाने १०,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाद्वारे सीमा भागात  आकाशाची अधिक बारकाईने टेहळणी करण्यासाठी भारतीय
हवाई दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक सहा विमाने समाविष्ट करण्यात
येणार आहेत. सध्या भारतीय बनावटीचे नेत्र व इस्रायली-रशियन बनावटीची फाल्कन विमाने हे काम करीत आहेत. 
नव्या प्रकल्पांतर्गत आकाशातून येणाऱ्या वस्तूची खूप आधीच
सूचना देणारी यंत्रणा एअरबस
ए३२० विमानांवर बसविण्यात येणार आहे. डीआरडीओ ही यंत्रणा विकसित करीत आहे. 
वास्तविक पाहता भारत-पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धानंतरच हा प्रकल्प हाती घेण्यात येणार
होता. परंतु तो प्रत्यक्षात उतरण्यास १९९०चे दशक उजाडले. त्यावेळी डीआरडीओने यासाठी खास प्रयोगशाळा तयार केली. याचा सुरूवातीचा काळ खडतर होता. सुरूवातीला ऐरावत या नावाने प्रकल्प हाती घेण्यात आला होता. 
१९९६ व १९९८च्या एअर शोमध्ये त्याचा सहभागही होता. परंतु
जानेवारी १९९मध्ये हे विमान तामिळनाडूमध्ये कोसळून हवाई दलाचे ४ अधिकारी व ४ शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: Border areas will now be closely monitored; 10,500 crore project sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.