Border standoff: पँगाँग लेक परिसरातून भारत-चीनचे सैनिक मागे हटण्यास सुरूवात; चिनी माध्यमाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 07:29 PM2021-02-10T19:29:37+5:302021-02-10T19:32:11+5:30

Border standoff : यापूर्वी दोन्ही देशांची नवव्या टप्प्यातील फेरी सकारात्मक झाल्याची देण्यात आली होती माहिती. सैनिक मागे हटण्यावर भारताकडून प्रतिक्रिया नाही.

Border standoff India China begin disengagement at Pangong Tso lake says global times china | Border standoff: पँगाँग लेक परिसरातून भारत-चीनचे सैनिक मागे हटण्यास सुरूवात; चिनी माध्यमाचा दावा

Border standoff: पँगाँग लेक परिसरातून भारत-चीनचे सैनिक मागे हटण्यास सुरूवात; चिनी माध्यमाचा दावा

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये वाढला होता तणावभारत चीनदरम्यान नवव्या टप्प्यातील चर्चा झाली होती सकारात्मक

गेल्या वर्षी मे महिन्यापासूच भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर हा वाद सोडवण्यासाठी देशातील सैन्य आणि राजकीय स्तरावरही अनेक चर्चा पार पडल्या आहेत परंतु आता पँगाँग लेकच्या दक्षिण आणि उत्तर भागातून भारत आणि चीन आपलं सैन्य मागे परतत असल्याचा दावा चिनी प्रपोगंडा पसवणारं वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं केला आहे. दरम्यान, चीनच्या या दाव्यावर भारतानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

"भारत आणी चीनच्या कमांडर स्तरावर झालेल्या नवव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार चीन आणि भारत बॉर्डर ट्रुप्सनं बुधावारी पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण भागातून मागे हटण्यास सुरूवात केली आहे," असा दावा ग्लोबल टाईम्सनं चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं केला आहे. 



सीमेवरील वातावरणाबाबत २४ जानेवारी रोजी भारत आणि चीनच्या दरम्यान नवव्या टप्प्यातील चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही देशांच्या मध्ये असलेल्या सीमेच्या परिसरातून सैनिकांची माघार घेण्याची प्रक्रिया अधिक जलद करण्यावर आणि पूर्व लडाख क्षेत्रात परिस्थिती नियंत्रणात आणि स्थिर करण्यावर एकमत झालं होतं. भारतीय लष्करानंही ही बाब सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं. तसंच संरक्षण मंत्रालयानंही यानंतर याबाबत माहिती देत नवव्या टप्प्यातील चर्चा सकारात्मक राहिल्याचं म्हटलं होतं. तसंच दोन्ही बाजूनं सैनिक हटवण्यावर सहमती झाली आहे. याव्यतिरिक्त दोन्ही बाजूंनी चर्चा सुरूच राहतील. तसंच तणाव कमी करण्यासाठी दहाव्या टप्प्याची चर्चाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 

कडाक्याच्या थंडीतही सैनिकांची तैनाती

सध्या लष्कराचे ५० हजारांपेक्षा अधिक सैनिक शून्य पेक्षाही कमी तापमानात देशाच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चीननंही आपले सैनिक त्या ठिकाणी तैनात केले आहे. पँगाँग लेक आणि आसपासचा परिसर रणनितिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर भारतानं त्या ठिकाणी गस्त वाढवली होती. 

Web Title: Border standoff India China begin disengagement at Pangong Tso lake says global times china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.