सीमेवरील तणावातही भारतात चीनमधूनच सर्वाधिक आयात; अमेरिकेकडून होणारी आयात दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:07 AM2021-03-19T07:07:01+5:302021-03-19T07:07:44+5:30

या वर्षात इतर देशांच्या तुलनेत चीनमधून सर्वाधिक आयात झाली आहे. चीननंतर अमेरिका, युएई, सौदी अरेबिया आणि इराक या देशांचा क्रमांक लागतो. हे भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमुख पाच देश आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेतून २६.८९ अब्ज डॉलरची आयात २०२०मध्ये झाली.  

In border tensions, India has the highest imports from China; Second place comes from US imports | सीमेवरील तणावातही भारतात चीनमधूनच सर्वाधिक आयात; अमेरिकेकडून होणारी आयात दुसऱ्या स्थानी

सीमेवरील तणावातही भारतात चीनमधूनच सर्वाधिक आयात; अमेरिकेकडून होणारी आयात दुसऱ्या स्थानी

Next

हरिश गुप्ता - 

नवी दिल्ली
: गेल्या वर्षी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेवर भारत आणि चीन यांच्या सैन्यात तीव्र स्वरूपाचा संघर्ष सुरू असतानाही जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात भारतातचीनमधूनच सर्वाधिक आयात झाल्याची माहिती सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत सांगितले की, २०२०मध्ये भारताने चीनमधून ५८.७१ अब्ज डॉलरचा माल आयात केला. (In border tensions, India has the highest imports from China; Second place comes from US imports)

या वर्षात इतर देशांच्या तुलनेत चीनमधून सर्वाधिक आयात झाली आहे. चीननंतर अमेरिका, युएई, सौदी अरेबिया आणि इराक या देशांचा क्रमांक लागतो. हे भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमुख पाच देश आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेतून २६.८९ अब्ज डॉलरची आयात २०२०मध्ये झाली.  

९२ कंपन्यांचे प्रकल्प
कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ९२ चिनी कंपन्यांनी भारतात प्रकल्प उभारले आहेत. त्यातील ८० कंपन्या सक्रिय आहेत. रिझर्व्ह बँकेच्या तपशिलानुसार, चीनमधून २,४७४ एफडीआय प्रस्ताव आले आहेत.

-  युएईतून २३.९६ अब्ज डॉलर, सौदी अरेबियातून १७.७३ अब्ज डॉलर आणि इराकमधून १६.२६ अब्ज डॉलरची आयात झाली. या सर्वोच्च पाच देशांतून एकूण १४३.५५ अब्ज डॉलरची आयात भारताने केली. एकूण आयातीच्या तुलनेत या पाच देशांतून झालेली आयात ३८.५९ टक्के आहे. २०२० मधील भारताची एकूण आयात ३७१.९८ अब्ज डॉलर आहे. 

- पुरी यांनी सांगितले की, उत्पादन आणि पुरवठा तसेच ग्राहकांची मागणी व प्राधान्ये यातील तफावत भरून काढण्यासाठी वस्तूंची आयात केली जाते. चीनमधून प्रामुख्याने दूरसंचार उपकरणे, संगणक हार्डवेअर व अनुषांगिक उत्पादने, वीज उत्पादने आदी वस्तू आयात केल्या. 
 

Web Title: In border tensions, India has the highest imports from China; Second place comes from US imports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.