शेतकरी कुटुंबात जन्म, आता रतन टाटांचे खासमखास, रोजची कमाई ३० लाख रुपये, कोण आहेत ते? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:57 PM2023-03-14T18:57:20+5:302023-03-14T19:11:24+5:30

N. Chandrasekaran : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एन. चंद्रशेखरन यांचा टाटा समुहाचे चेअरमन बनण्यापर्यंतचा प्रवास हा खूप शानदार असा आहे. टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारे चंद्रशेखरन २०१७ मध्ये टाटा समुहाच्या उच्च पदापर्यंत पोहोचले होते.

Born in a farmer's family, now Ratan Tata's Khasmakhas, earning Rs 30 lakh per day, who is he? see | शेतकरी कुटुंबात जन्म, आता रतन टाटांचे खासमखास, रोजची कमाई ३० लाख रुपये, कोण आहेत ते? पाहा

शेतकरी कुटुंबात जन्म, आता रतन टाटांचे खासमखास, रोजची कमाई ३० लाख रुपये, कोण आहेत ते? पाहा

googlenewsNext

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एन. चंद्रशेखरन यांचा टाटा समुहाचे चेअरमन बनण्यापर्यंतचा प्रवास हा खूप शानदार असा आहे. टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारे चंद्रशेखरन २०१७ मध्ये टाटा समुहाच्या उच्च पदापर्यंत पोहोचले होते. टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वादानंतर एन. चंद्रशेखर यांना टाटा सन्सचं चेअरमन बनवण्यात आलं होतं. आज आम्ही त्यांच्या प्रवासाबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत. 

एन. चंद्रशेखरन यांचा जन्म १९६३ मध्ये तामिळनाडूतील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण एका सरकारी शाळेत झालं होतं. पुढे त्यांनी तिरुचिरापल्ली येथील प्रादेशिक इंजिनियरिंग कॉलेजमधून मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनची पदवी मिळवली होती. नंतर १९८७ मध्ये त्यांनी एक इंटर्न म्हणून टीसीएसमधून कामाला सुरुवात केली. पुढे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. २००९ मध्ये ते टीसीएसचे सीईओ बनले. ते टाटा समुहामध्ये सीईओ बनलेल्या सर्वात तरुण अधिकाऱ्यांपैकी ते एक होते.

चंद्रशेखरन यांच्या पत्नीचं नाव ललिता आहे. तर त्यांच्या मुलग्याचं नाव प्रणव चंद्रशेखरन आहे. २०१९ मध्ये चंद्रशेखरन यांचं वार्षिक वेतन ६५ कोटी रुपये एवढं होतं. २०२१-२२  मध्ये त्यांचं वेतन वाढवून १०९ कोटी रुपये करण्यात आलं. त्याबरोबरच भारतात सर्वाधिक वेतन घेणारे एक्झिक्युटीव्ह बनले. त्यांनी २०२० मध्ये मुंबईतील पेडर रोडवर ९८ कोटी रुपयांना एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता.

चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली २०२२मध्ये टाटा ग्रुपचा नफा ६४ हजार २६७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर २०१७ मध्ये जेव्हा त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती तेव्हा हा नफा ३६ हजार ७२८ कोटी रुपये होता. त्यांच्या कार्यकाळात टाटा समुहाचा महसूल ६.३७ लाख कोटी रुपयांवरून वाढून ९.४४ लाख कोटी रुपये झाला होता. २०२२ मध्ये त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवण्यात आला.  

Web Title: Born in a farmer's family, now Ratan Tata's Khasmakhas, earning Rs 30 lakh per day, who is he? see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.