धक्कादायक! उधारीचे १५०० रुपये दिले नाहीत, तरुणाला स्कुटरला बांधून पळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:45 PM2022-10-18T12:45:52+5:302022-10-18T12:57:53+5:30
एखाद्याने पैसे वेळेत परत केले नाहीत म्हणून मारहाणीच्या घटना आपण अनेक ठिकाणी पाहिल्या आहेत. काही ठिकाणी सावकारकीच्या घटनाही समोर येतात.
एखाद्याने पैसे वेळेत परत केले नाहीत म्हणून मारहाणीच्या घटना आपण अनेक ठिकाणी पाहिल्या आहेत. काही ठिकाणी सावकारकीच्या घटना समोर येतात. सावकारांनी पैशांसाठी केलेल्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना ओडिशातून समोर आली आहे. उधारीचे पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाला स्कुटरला रस्सीने बांधून २ किलोमीटर पळवल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे.
या घटनेचा फोटो समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधीत तरुणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू केली आहे. ही घटने ओडिशा येथील कटक येथील आहे. या संदर्भात पोलीस अधिकारी डीसीपी पिनाक मिश्रा यांनी माहिती दिली.
"सोमवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. मंगळवारी पीडित तरुणासोबत आरोपीचीही ओळख पटली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. जगन्नाथ बेहरा असे पीडित तरुणाचे नाव आहे. जगन्नाथने आरोपींकडून १५०० रुपये उसने घेतले होते. ते पैसे त्याने वेळेत परत केले नाहीत म्हणून त्या आरोपींनी त्याचे दोन्ही हात स्कूटरला दोरीने बांधले आणि कटकच्या गर्दीचा असणाऱ्या रस्त्यावर त्याला २ किलोमीटरहून अधिक पळायला लावले.
आता हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय
रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तरुणासोबत ही धक्कादायक घटना घडली. या नंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवरुन पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पीडित तरुण जगन्नाथची आरोपी व्यक्तीशी आधीच ओळख होती. त्याने आरोपींकडून १५०० रुपये उसने घेतले होते, मात्र ते पैसे परत करू शकले नाहीत. या रागात गुंडांनी अमानुष कृत्य केले. गुंडांनी आधी त्यांचे हात बांधले आणि नंतर दोरीने स्कूटरला बांधले. आणि रस्त्यावरुन पळवले.