कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा

By admin | Published: January 28, 2017 02:41 PM2017-01-28T14:41:12+5:302017-01-28T15:12:35+5:30

बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या अधोगतीचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे.

Borrowing the opposite of Vijay Mallya | कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा

कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या अधोगतीचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे. सरकारची धोरणे आणि आर्थिक परिस्थितींमुळे किंगफिशर एअरलाइन्स रसातळाला गेली, असा आरोप माल्याने केला आहे. 
 
सरकारकडे कर्ज देण्यासाठी नाही तर  मदत करत करण्यासाठी विनंती केली होती, अशा उलट्या बोंबाच विजय माल्याने मारल्या आहेत.  सरकारी कंपनी 'एअर इंडिया'ला आर्थिक संकटातून उभारी मिळावी यासाठी जनतेचा पैसा वापरण्यात आला, मात्र सर्वात मोठ्या स्थानिक एअरलाइन कंपनीच्या बाबतीत हेच धोरण अंमलात आणले गेले नाही, असा कांगवा माल्याने केला आहे. 
 
ट्विट करत विजय माल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी सरकारी धोरणांवर टीका केली आहे. 'कर्जाऐवजी सरकारने आपल्या धोरणांमध्ये बदल करुन मदत करावी', अशी मागणी केल्याचा दावा त्याने केला आहे.  शिवाय एअर इंडियाला देण्यात आलेल्या निधीवरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, 'किंगफिशर एअरलाईन्स ज्यावेळी डबघाईला आली तेव्हा तेलाची किंमत 140 डॉलर प्रति बॅरेल एवढी होती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली होती. यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली', असे सांगत त्याने स्वतःचा बचाव करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. 
 
या कालावधीत किंगफिशर कंपनीवर याची मोठ्या प्रमाणात झळ सहन करावी लागली. यावेळी सरकारने एअर इंडियाला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढले मात्र किंगफिशरला मदत केली नाही, असा आरोप माल्याने केला आहे. 
 
माल्याने असाही दावा केला आहे की,  किंगफिशर एअरलाइन्स भारतातील सर्वात मोठी आणि चांगली एअरलाइन्स कंपनी होती, जी दुर्देवाने आर्थिक आणि सरकारी धोरणांमुळे अयशस्वी ठरली.  त्याने कंपनीतील कर्मचारी आणि भागधारकांची माफीही मागितली. किंगफिशरवर कर्ज स्वरुपात सार्वजनिक निधी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे, मात्र एअर इंडियालाही निधी पुरवण्यात आला होता, त्याचा काय?, असा उलट प्रश्नच माल्याने सरकारसमोर उपस्थित करत बँकांना हजारो कोटी रुपयांना लुटल्याच्या प्रकरणातून पळ काढण्यात प्रयत्न केला आहे.
 
 

Web Title: Borrowing the opposite of Vijay Mallya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.