दोघेही राजा राणी, २७ वर्षांचा संसार, चार मुलं, पण आता UPमधील बाहुबली नेता घेतोय घटस्फोट, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 06:26 PM2023-04-09T18:26:04+5:302023-04-09T18:28:02+5:30
RajaBhaiya Wife Bhanvi Kumari Divorce: उत्तर प्रदेशमधील कुंडा विधानसभा मतदारसंधातील जनसत्ता पक्षाचे आमदार आणि बाहुबली नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी कुमारी हे घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आहेत.
उत्तर प्रदेशमधील कुंडा विधानसभा मतदारसंधातील जनसत्ता पक्षाचे आमदार आणि बाहुबली नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी कुमारी हे घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आहेत. राजा भैय्या आणि भानवी कुमारी यांच्यातील कौटुंबिक आणि वैवाहिक वाद कौर्टाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. या दोघांमधील घटस्फोटाच्या प्रकऱणावर दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये सोमवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
राजा भैय्या यांची पत्नी भानवी सिंह आणि राजा भैय्या यांचा भाऊ अक्षय प्रताप सिंह उर्फ गोपालजी यांच्यातील कायदेशीर लढाईच्या झळा राजा भैय्या यांच्या वैवाहिक जीवनाला बसताना दिसत आहेत. आधी हा वाद राजा भैय्या यांची पत्नी भानवी सिंह आणि त्यांचा धाकटा भाऊ अक्षय प्रताप सिंह यांच्यात होता. मात्र राजा भैय्या यांनी या वादात भावाची बाजू घेतल्याने भानवी सिंह ह्या नाराज झाल्या आहेत. त्यातून हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे.
दिल्लीतील साकेत कोर्ट राजा भैय्या आणि त्यांच्या पत्नीमधील काडीमोडाच्या खटल्यावर सोमवारी सुनावणी करणार आहे. साकेत कोर्टामध्ये राजा भैय्या यांची पत्नी भावनी यांनी गेल्या महिन्यात जोरबाग पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरच्या आधारावर खटला दाखल केला होता. त्या एफआयआरमध्ये त्यांनी आमदार अक्षय प्रताप सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
राजा भैय्या आणि भानवी सिंह यांचा विवाह १९९५ नध्ये झाला होता. राजा भैय्या हे कुंडा येथील राजघराण्याशी संबंधित आहेत. तर भानवी सिंह ह्या बस्ती राज घराण्यामधील आहेत. या दोघांनाही दोन मुली आणि दोन मुलगे आहेत. दरम्यान, राजा भैय्या यांच्या भावाशी झालेल्या वादातून या दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला आहे. गेल्या काही काळापासून हे दोघेही वेगळे राहत आहेत.