बिहारमध्ये दोन्ही आघाड्या काठावर !

By admin | Published: November 6, 2015 03:23 AM2015-11-06T03:23:41+5:302015-11-06T03:23:41+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) मिश्र भाकीत वर्तविण्यात आले असून नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील महाआघाडी आणि भाजपाप्रणीत

Both halves on the edge of Bihar! | बिहारमध्ये दोन्ही आघाड्या काठावर !

बिहारमध्ये दोन्ही आघाड्या काठावर !

Next

एक्झिट पोलचा कौल : बरेच अंदाज महाआघाडीच्या निसटत्या यशाचे; चाणक्य मात्र रालोआच्या बाजूने

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) मिश्र भाकीत वर्तविण्यात आले असून नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील महाआघाडी आणि भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सत्तास्थापनेसाठी अटीतटीची रस्सीखेच अपेक्षित असल्याचे चित्र आहे. परंतु गेल्या लोकसभेत वास्तवाच्या सर्वाधिक जवळचे भाकीत केलेल्या टुडेज चाणक्यने रालोआला २४३ पैकी १५५ जागांवर विजयासह स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. इतर दोन मोठ्या एक्झिट पोलने महाआघाडीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे म्हटले आहे. तर आणखी काही चाचण्यांमध्ये महाआघाडीला निसटता विजय मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. परंतु दोन वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी सावध पवित्रा घेत दोघांपैकी कुठलीही आघाडी बिहारमध्ये सरकार स्थापन करू शकते, असा निष्कर्ष काढला आहे. बिहारमधील पाच टप्प्यांतील मतदानाची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली असून, येत्या ८ नोव्हेंबरला रविवारी निकाल जाहीर होणार आहेत. सट्टेबाजांनी बिहारमध्ये भाजपा जिंकणार असे भाकीत केले होते. परंतु गेल्या आठवडाभरापासून मात्र या पक्षाचा पराभव होणार, या अंदाजाने शेअर बाजारात घसरण सुरू आहे. दुसरीकडे महाआघाडीच्या नेत्यांनी विजयोत्सव साजरा करणे सुरू केले असून, भाजपाचे नेते मात्र मतदानोत्तर चाचण्यांवर सतर्कपणे प्रतिक्रिया देत आहेत.

शेवटच्या टप्प्यात ६० टक्के मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात गुरुवारी ५७ जागांसाठी झालेल्या मतदानात ६० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच राज्यात एकूण २४३ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या ८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

56.8%
सरासरी मतदान
एकूण पाच टप्प्यांत ५६.८ टक्के मतदान झाले असून बिहार विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक मतदान आहे.

- मागील चार टप्प्यांच्या तुलनेत अखेरच्या टप्प्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. सहरसा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सिमरी बख्तियारपूर आणि महिषी या दोन मतदारसंघांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून दुपारी ३ वाजताच मतदान संपले.

- बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात ५४.५, तिसऱ्या टप्प्यात ५३.३२ आणि चौथ्या टप्प्यात ५७.५९ टक्के मतदान झाले.

- विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपतो आहे.

बिहारचा एक्झिट पोल
भाजपा+जदयू+इतर
टुडे चाणक्य -न्यूज 24१५५८३५
इंडिया टुडे ग्रुप -सिसरो१११-१२७११२-१३२४-८
इंडिया टीव्ही- सीव्होटर्स१०१-१२१११२-१३२६-१४
एबीपी न्यूज-नेल्सन१०८१३०५
टाइम्स नाऊ- सीव्होटर्स११११२२१०
न्यूजएक्स९०-१००१३०-१४०१३-२३
न्यूज नेशन११७१२२४

Web Title: Both halves on the edge of Bihar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.