अपघातात दोघे जखमी
By Admin | Published: November 15, 2015 09:13 PM2015-11-15T21:13:39+5:302015-11-17T00:30:31+5:30
मुरुड : एका चारचाकी वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना लातूर-बार्शी रोडवरील रामेगाव शिवारात घडली. या प्रकरणी गातेगाव पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर येथील शिवाजी जाधव या कार चालकाने आपल्या ताब्यातील वाहन (एमएच १२ जेसी १२४३) ही निष्काळजीपणे भरधाव वेगात चालविल्याने ११ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास रामेगाव शिवारात अपघात झाला. यात दोघे जखमी झाले. या प्रकरणी रामदास जाधव (रा. हाळी खु.) यांच्या फिर्यादीवरून गातेगाव पोलिस ठाण्यात शिवाजी जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)