रेल्वे चोरीच्या गुन्ात भादली दोघांचा समावेश
By admin | Published: February 7, 2016 10:45 PM2016-02-07T22:45:21+5:302016-02-07T22:45:21+5:30
जळगाव: दुचाकी चोरीच्या गुन्ात जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात असलेला सचिन उर्फ नाना धनगर हा रेल्वेत बॅगा चोरीत माहीर असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यासोबत रेल्वेत भादली ता.जळगाव येथील आणखी दोन जण असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान,रविवारी भुसावळ लोहमार्ग गुन्हे शाखेचे एक पथक जळगावात त्याच्या चौकशीसाठी आले होते.
Next
ज गाव: दुचाकी चोरीच्या गुन्ात जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात असलेला सचिन उर्फ नाना धनगर हा रेल्वेत बॅगा चोरीत माहीर असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यासोबत रेल्वेत भादली ता.जळगाव येथील आणखी दोन जण असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान,रविवारी भुसावळ लोहमार्ग गुन्हे शाखेचे एक पथक जळगावात त्याच्या चौकशीसाठी आले होते.भुसावळला असलेल्या गुन्ात नाना धनगरचा सहभाग आहे का? याची माहिती लोहमार्ग पोलीस घेत आहेत. पोलीस निरीक्षक देसले यांच्या पथकाने त्याची कोठडीत तब्बल एक तास चौकशी केली. या चौकशी दरम्यान, रेल्वेत चोरी करताना भादली येथील दोन माझ्यासोबत होते, असे त्याने जिल्हा पेठ व लोहमार्ग पोलिसांना सांगितले. सोमवारी नानाच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. नंदूरबार व भुसावळ लोहमार्ग पोलीस त्याला ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शनिवारी नंदूरबारचे सहायक निरीक्षक योगेश पाटील यांनीही जळगावला येवून नानाची चौकशी केली. दरम्यान, रविवारी त्याची आई व भावाच्या मुलीने त्याची पोलीस कोठडीत भेट घेतली. मुलाच्या हातात बेड्या पाहून तिचा अश्रुचा बांध फुटला होता.दुचाकी चोरटे पकडलेसार्वजनिक बांधकाम विभागाच्या पार्कींग आवारात लावलेली दुचाकी चोरुन नेल्याच्या गुन्ात योगेश उर्फ रिंकु शिवाजी पाटील (वय २३ रा.गोराडखेडा ता.पाचोरा व रोहीत किशन झांझोटे (वय २१ रा.पाचोरा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पकडले. नितीन रामचंद्र सोनवणे (रा.नांद्रा ता.जळगाव) यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ ए.एन.०९२९) शनिवारी दुपारी चोरी गेली होती. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.