दोघांनी केलेला बलात्कार सामूहिक नव्हे
By Admin | Published: October 10, 2015 02:33 AM2015-10-10T02:33:49+5:302015-10-10T02:33:49+5:30
एखाद्या महिलेवर दोन पुरुषांनी बलात्कार केल्यास तो सामूहिक ठरत नाही, अशी मुक्ताफळे उधळणारे कर्नाटकचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे
बंगळुरू : एखाद्या महिलेवर दोन पुरुषांनी बलात्कार केल्यास तो सामूहिक ठरत नाही, अशी मुक्ताफळे उधळणारे कर्नाटकचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. जॉर्ज यांच्या या वाचाळपणावर राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांना नोटीस बजावली आहे.
बेंगळुरुमध्ये गेल्या आठवड्यात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याच्या गृहमंत्र्यांनी उपरोक्त विधान केले. ‘तुम्ही याला सामूहिक बलात्कार कसे म्हणू शकता. सामूहिक बलात्काराचा अर्थ होतो चार-पाच लोक’ अशी व्याख्या जॉर्ज यांनी केली होती. भाजपाने जॉर्ज यांचे हे वक्तव्य असंवेदनशील असल्याचा आरोप केला. (वृत्तसंस्था)