तृणमूल काँग्रेस आमदाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 10:28 AM2019-02-10T10:28:23+5:302019-02-10T10:37:01+5:30

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Both of them were arrested in the murder of Trinamool Congress MLA | तृणमूल काँग्रेस आमदाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

तृणमूल काँग्रेस आमदाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

कोलकाता - पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी एफआयआर दाखल केलं असून, दोघा आरोपींना अटक केली आहे. तसेच हन्सखली पोलीस स्टेशनचे ठाणेकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. सत्यजीत बिश्वास हे कृष्णगंज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. नाडिया जिल्ह्यात ही घटना घडली. सरस्वती मातेची पूजा सुरू असताना त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 



सत्यजित बिश्वास यांची हत्या भाजपाच्या सांगण्यावरूनच केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. सत्यजित यांना गंभीर जखमी अवस्थेत शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सत्यजित यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपाच्या या कामासाठी मदत केल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसने ट्विटवरून केला आहे.

Web Title: Both of them were arrested in the murder of Trinamool Congress MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.