पान टपरी फोडताना दोघांना रंगेहाथ पकडले शनी मदिंराजवळील घटना : रोख रक्कम व साहित्य हस्तगत
By admin | Published: February 5, 2016 10:22 PM2016-02-05T22:22:29+5:302016-02-05T22:22:29+5:30
फोटो...
Next
फ टो...जळगाव : पान टपरी फोडून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या सागर प्रकाश पवार (शनी पेठ) व अक्षय आनंद जावळे (वय २० रा.गुरुनानक नगर, शनी पेठ) या दोघांना शनी मंदिराजवळ शनी पेठ पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता रंगेहाथ पकडले. दोघांना अटक करण्यात आली असून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.शनी मंदिराजवळ गणेश मोहन गवळी (वय ३९ रा.शनी पेठ) यांच्या मालकीची श्रीकृष्ण पान सेंटर म्हणून टपरी वजा दुकान आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजता एका पोलीस मित्राने ही पानटपरी दोन फोडत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांना मोबाईलवरुन दिली. घरी असलेल्या प्रधान यांनी क्षणाचा विलंब न करता रात्रीच्या ड्युटीला असलेल्या गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी पाठविले. तेथे अक्षय जावळे व सागर प्रकाश या दोघांनी पान टपरी फोडलेली होती. त्यातील रोख रक्कम व साहित्य घेऊन पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. पोलीस स्टेशनला आणून दोघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन हजार रुपयांची चिल्लर, दहा रुपयाच्या वीस नोटा अशी दोन हजार दोनशे रुपये रोख, अर्धा तोळ्याचे दोन तर एक तोळ्याचा एक असे चांदीचे तीन सिक्के, सिगारेट व कुलूप आदी मुद्देमाल त्यांच्याजवळ मिळून आला.इन्फो..जावळेचा हद्दपारीचा प्रस्तावआकाश जावळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी दिली. दरम्यान, चौबे शाळेजवळील किराणा दुकानातील चोरीच्या प्रकरणातील संशयित पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याचे प्रधान म्हणाले.