Boxer Death Bangalore: एका ठोशाने घेतला जीव; बॉक्सिंग मॅचदरम्यान 23 वर्षीय खेळाडूचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 02:31 PM2022-07-14T14:31:02+5:302022-07-14T14:31:56+5:30

Boxing Competition: बंगळुरुमध्ये बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यादरम्यान एका 23 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू झाला.

Boxer Death in Bangalore: Karnataka boxer dies during KickBoxing competition in Bangalore | Boxer Death Bangalore: एका ठोशाने घेतला जीव; बॉक्सिंग मॅचदरम्यान 23 वर्षीय खेळाडूचा मृत्यू

Boxer Death Bangalore: एका ठोशाने घेतला जीव; बॉक्सिंग मॅचदरम्यान 23 वर्षीय खेळाडूचा मृत्यू

Next

Boxer Death in Banglore: जगभरात अनेक ठिकाणी बॉक्सिंक स्पर्धेचे आयोजन केले जाते. बॉक्सिंग हा जितका मनोरंजक वाटतो, तितकाच धोकादायक खेळ आहे. यात खेळाडूंना गंभीर इजा होते, अनेकदा मृत्यूही झाल्याच्या बातम्या समोर येतात. पाश्चिमात्य देशांमध्ये या खेळाचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. दरम्यान, बंगळुरुमध्ये बॉक्सिंग सामन्यात एका बॉक्सरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान अपघात 
बंगळुरुमध्ये किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एका 23 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू झाला आहे. बॉक्सर दोन दिवस कोमात राहिला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी खेळाडूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 10 जुलै रोजी घडली. 

दोन दिवस कोमात
बंगळुरुच्या जनभारती पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एका सामन्यात नवीन आणि निखिल नावाचे खेळाडू एकमेकांसोबत बॉक्सिंग करत होते, यादरम्यान निखिल नवीनच्या एका जोरदार ठोशात जमिनीवर कोसळला. अनेक प्रयत्न करूनही निखिलला जाग आली नाही तेव्हा त्याला रुग्णालयात नेले. दोन दिवस तो कोमात राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा 
या प्रकरणी आता बंगळुरू पोलिसांनी आयोजक आणि प्रतिस्पर्धी खेळाडू नवीनविरुद्ध आयपीसीच्या कलम 304 ए अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. म्हैसूरच्या या खेळाडूने अल्पावधीतच किक बॉक्सिंगमध्ये चांगले नाव कमावले होते. निखिलचे वडीलही कराटे खेळाडू आहेत. दरम्यान, निखिलच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 

Web Title: Boxer Death in Bangalore: Karnataka boxer dies during KickBoxing competition in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.