शेतकरी आंदोलनात पोहोचला बॉक्सर विजेंदर सिंग; खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा
By मोरेश्वर येरम | Published: December 6, 2020 02:36 PM2020-12-06T14:36:04+5:302020-12-06T14:44:04+5:30
विजेंदर सिंगसोबतच याआधीच पंजाब आणि हरियाणातून अनेक माजी खेळाडूंनी अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे.
दिल्ली
नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज सलग ११ वा दिवस आहे. दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकरी थंडीत गेल्या १० दिवसांपासून दिवसरात्र ठिय्या मांडून बसले आहेत. सिंघू सीमेवर आज बॉक्सर विजेंदर सिंग देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचला आहे.
"शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मी मला देण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार आहे", असा इशारा विजेंदर सिंगने दिला आहे. खेलरत्न पुरस्कार हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
If the government doesn't withdraw the black laws, I'll return my Rajiv Gandhi Khel Ratna Award - the highest sporting honour of the nation: Boxer Vijender Singh #FarmLawshttps://t.co/8Q5fVEmncCpic.twitter.com/imTATDZCei
— ANI (@ANI) December 6, 2020
पुरस्कार वापसीची मोहीम
विजेंदर सिंगसोबतच याआधीच पंजाब आणि हरियाणातून अनेक माजी खेळाडूंनी अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजन सिंग चीमा आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबीर कौर यांचा समावेश आहे.
९ डिसेंबरला पुढील बैठक
शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या बैठकांमध्ये आतापर्यंत काहीच तोडगा निघालेला नाही. शनिवारी दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेली पाचवी बैठक देखील निष्फळ ठरली. आता ९ डिसेंबर रोजी पुन्हा चर्चा होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केलं आहे. तर शेतकरी संघटनांकडून ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची घोषणा करण्यात आली आहे.