मुलगा रडू लागला म्हणून भारतीय अधिकाऱ्याच्या कुटुंबास विमानातून उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 02:40 PM2018-08-09T14:40:53+5:302018-08-09T14:48:36+5:30
''विमान धावपट्टीकडे जाऊ लागल्यावर कर्मचाऱ्यांपैकी एकाने अपशब्द वापरुन जर तू शांत राहिला नाहीस तर खिडकीतून बाहेर फेकेन अशी धमकी दिली व नंतर आम्हाला उतरवण्यात आले. ''
नवी दिल्ली- तीन वर्षांचा मुलगा विमानात रडू लागला म्हणून एका भारतीय अधिकाऱ्याच्या कुटुंबास ब्रिटिश एअरवेजने उतरवल्याची घटना घडली आहे. 23 जुलै रोजी ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
.
ए. पी. पाठक असे या सनदी अधिकाऱ्यांचे नाव असून त्यांचे कुटुंब लंडन ते बर्लिन असा ब्रिटिश एअरवेजमधून प्रवास करत होते. या घटनेची माहिती देताना पाठक म्हणाले, 'आम्ही प्रवास करत असताना आमचा तीन वर्षांचा मुलगा रडू लागला, फ्लाइट अटेंडंटने त्याला थांबायला सांगितले आणि जर रडणे थांबवले नाही तर विमानातून उतरवू अशी धमकी दिली. काहीवेळ तो शांत झालेला नसल्याचे लक्षात आल्यावर आम्हाला विमानातून उतरवले गेले.'
I have given a letter to Aviation Minister Suresh Prabhu and EAM Sushma Swaraj and complained to British Airways but they have not replied yet, it was an act of racial discrimination, I request an apology and compensation for harassment of an Indian: A.P Pathak, Passenger pic.twitter.com/6bb5wekgaZ
— ANI (@ANI) August 9, 2018
ते पुढे म्हणाले, माझ्या मुलाची जागा खिडकीशेजारी होती. त्याला शांत करण्यासाठी तेथे माझी पत्नी बसली होती. तरीही तेथए जाऊन माझ्यामुलाला अटेंडंटने खडसावले. विमान धावपट्टीकडे जाऊ लागल्यावर कर्मचाऱ्यांपैकी एकाने अपशब्द वापरुन जर तू शांत राहिला नाहीस तर खिडकीतून बाहेर फेकेन अशी धमकी दिली व नंतर आम्हाला उतरवण्यात आले. यासंदर्भात तक्रार करुनही ब्रिटिश एअरवेजच्या व्यवस्थापनाने काहीही कारवाई केली नाही.
यासर्व प्रकारामुळे पाठक यांना लंडनमध्येच एक रात्र राहावे लागले आणि बर्लिनला जाण्यासाठी खर्च करावा लागला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात ते सहसचिव पदावरती कार्यरत आहेत. पाठक यांनी ब्रिटिश एअरवेजकडे तक्रार केली असून केंद्रीय हवाईउड्डाण मंत्री सुरेश प्रभू व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही पत्र लिहिले आहे.
Bureaucrats Indian family deplaned by @British_Airways as 'child kept crying'. #Avgeekspic.twitter.com/1qbMV9fQre
— Ashoke Raj (@ashokeraj007) August 9, 2018