ट्विटरवर एक दिवसासाठी महिला टाकतायेत बहिष्कार, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 12:13 PM2017-10-13T12:13:13+5:302017-10-13T12:16:32+5:30
शुक्रवारी ट्विटरवर #WomenBoycottTwitter ट्रेडिंग आहे. दुनियेतील अनेक महिला याचं समर्थन करत एका दिवसासाठी ट्विटर सोडत आहेत.
मुंबई- सोशल मीडियाचा वापर सगळीकडेच वारेमाप सुरू आहे. सोशल मीडियामध्ये खूप ताकदं आहे, असं ही बोललं जातं. एखाद्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा असेल किंवा विरोध दर्शवायचा असेल तर लोक सोशल मीडियाचा वापर करतात आणि आपली मतं मांडतात. याचंच उदाहरण शुक्रवारी सकाळपासून पाहायला मिळतं आहे. शुक्रवारी ट्विटरवर #WomenBoycottTwitter ट्रेडिंग आहे. दुनियेतील अनेक महिला याचं समर्थन करत एका दिवसासाठी ट्विटर सोडत आहेत.
1) @jeffbezos I told the head of your studio that HW raped me. Over & over I said it. He said it hadn’t been proven. I said I was the proof.
— rose mcgowan (@rosemcgowan) October 12, 2017
महिला ट्विटरवर एक दिवसासाठी बहिष्कार टाकत असल्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रोज मॅकगॉवन हिने ट्विटरवर हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हार्वे विंस्टन विरूद्ध अनेक खुलासे केले. हार्वेने 1997 मध्ये माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्री रोजने केला आहे. निर्माता-दिग्दर्शक हार्वेवर आरोप केल्यानंतर काहीवेळातच ट्विटरने रोज मॅकगॉवनंच अकाऊंट सस्पेंड केलं. रोजचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर महिलांनी त्याला पूर्णपणे विरोध केला. ट्विटर ही सोशल नेटवर्किंग साइट स्त्री-पुरूषांमध्ये भेदभाव करते, असा आरोप महिलांनी केला. महिलेने पुरूषाविरोधात आवाज उठवला तर तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उघडउघड धमकी देतात तेव्हा त्यांच्या अकाऊंटवर ट्विटरकरून कारवाई का करण्यात येत नाही? असा सवालही महिलांनी उपस्थित केला.
Too bad twitter didn't suspend @realDonaldTrump when he tweeted Lindsay Graham's phone number. Guess @rosemcgowan deserved it though.
— Audrey Wauchope (@audreyalison) October 12, 2017
अभिनेत्री रोजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ट्विटवर अकाऊंट सस्पेंड केल्याची माहिती दिली. ट्विटरच्या पॉलिसीचं उल्लंघन होत असल्याने ट्विटरने अकाऊंट सस्पेंड केल्याचं रोजने सांगितलं आहे. एक दिवसानंतर ट्विटरने रोजच्या अकाऊंटवरील बॅन हटवला. त्यानंतर रोजने एकामागे एक ट्विट करत निर्माता-दिग्दर्शक हार्वेवर निशाणा साधला.
लैगिक शोषणच्या विरोधात बोलल्यामुळे रोजचं अकाऊंट ट्विटरने सस्पेंड केल्याची बातमी काही वेळातत व्हायरल झाली आणि ट्विटरच्या विरोधात #WomenBoycottTwitter हा हॅशटॅग ट्रेंड झाला. भारतातही शुक्रवारी सकाळपर्यंत हा हॅशटॅग टॉपवर होता.
Regardless of your gender identity, I hope you'll join us in solidarity with @rosemcgowan! See you on Saturday!#WomenBoycottTwitterpic.twitter.com/rHjIsH6mj4
— Charles Clymer🏳️🌈 (@cmclymer) October 13, 2017
ट्विटरने दिलं स्पष्टीकरण
ट्विटरवर महिलांच्या सुरू असलेल्या आक्रोशानंतर ट्विटरकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रोजने त्यांचा खासगी मोबाइल नंबर ट्विट केल्याने त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं. खासगी नंबर ट्विटवर टाकणं हे ट्विटकच्या गाईडलाईनचं उल्लंघन असून, ते ट्विट डिलीट केल्यानंतर पुन्हा त्यांचं अकाऊंट सुरू करण्यात आल्याचं ट्विटरने सांगितलं. आपलं खरं मत मांडणाऱ्या प्रत्येकासोबत ट्विटर असल्याचं ट्विटरने आपल्या स्पष्टीकरणात म्हंटलं आहे. पण ट्विटरच्या या माफीनाम्याचा काहीही उपयोग झाला नसून अनेकांनी ट्विटर अकाऊंट एका दिवसासाठी डिलीट केली आहेत.