भुताटकीच्या संशयावरून आदिवासी कुटुंबावर बहिष्कार
By Admin | Published: September 4, 2015 11:39 PM2015-09-04T23:39:40+5:302015-09-04T23:39:40+5:30
नाशकातील घटना : घरावर हल्ला, तोडफोड
न शकातील घटना : घरावर हल्ला, तोडफोडनाशिक : भुताटकी करत असल्याच्या संशयावरून गावातून बहिष्कृत केलेल्या आदिवासी कुटुंबाला जीव वाचविण्यासाठी २१ दिवसांपासून रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. बागलाण तालुक्यातील मानूर खैराडपाडा येथील पंडित बहिरम या आदिवासी कुटुंबावर हा हृदयद्रावक प्रसंग गुदरला आहे.येथील जिवतूबाई व पंडित बहिरम हे आपल्या मंगळ्या, रमेश व तुळशी या मुलांबरोबर राहात होते. दीड बिघे जमीन कसून ते उदरनिर्वाह करत होते. गेल्या ऑगस्ट महिन्यात पंडित यांच्या घराजवळच राहणारा त्यांचा धाकटा भाऊ पंढरीनाथ याची मुलगी संगीता (१०) तापाने फणफणली होती. ताप उतरत नसल्यामुळे सोमा महाराज या बाबाला पाचारण करण्यात आले. १३ ऑगस्टच्या रात्री संगीतावर सोमाने अघोरी विद्येचा वापर सुरू केला. मात्र वैद्यकीय उपचाराअभावी ताप थेट मेंदूत गेल्याने संगीताची प्राणज्योत मालवली. सकाळी अचानक सोमाच्या अंगात आले. त्याने तुमच्या घरात जिवतूबाई ही भुतीण आहे. तिने आतापर्यंत अकरा जणांना खाल्ले असून, आता संगीताचा बळीही तिने घेतल्याचे सांगितले. त्यामुळे संगीताच्या मृतदेहाजवळच सख्ख्या भावासह गावकरी जिवतूबाई, पंडित दाम्पत्यावर तुटून पडले. बचावासाठी हे दाम्पत्य तिन्ही मुलांसह घरात लपून बसले. मात्र गावकर्यांनी घरावर दगडफेक करून कुर्हाडीने दरवाजा तोडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी दरवाजाने जंगलात पळ काढून जीव वाचवला.(प्रतिनिधी)-----------------------------पोलीस यंत्रणा उदासीनबहिरम कुटुंबीयाने त्याच रात्री डांगसौंदाणे पोलीस औट पोस्ट गाठत बेतलेला प्रसंग कथन केला. मात्र साहाय्यक पोलीस निरीक्षक जी. के. वनारे, हवालदार अनिल अहिरे यांनी तक्र ार घेण्याऐवजी त्यांना राज्य सोडण्याचा सल्ला दिला.