#BoycottKFC: यांची हिम्मत कशी होते? केएफसीचे देखील काश्मीरवरून ट्विट; आता मागतेय माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 11:35 PM2022-02-07T23:35:21+5:302022-02-07T23:35:53+5:30
BoycottKFC Trend: अनेकांनी केएफसीला आता बोऱ्या बिस्तरा गुंडाळा आणि निघा, असे सुनावले होते. काश्मीर सोलिडेटरी डेवर पाकिस्तानी केएफसीने आम्ही काश्मीरींसोबत असल्याचा फोटो पोस्ट केला होता.
काश्मीरवरून पाकिस्तान ह्युंदाईने ट्विट केल्यानंतर आता केएफसीने देखील अशाचप्रकारचे कृत्य केले आहे. ट्विटरवर आम्ही काश्मीरींसोबत आहोत, असे ट्विट पाकिस्तानमधील केएफसीने केले होते. तसेच काश्मीरींना स्वातंत्र्य मिळावे, असे काश्मीर दिनानिमित्त म्हटले होते. यामुळे ह्युंदाई सारखील केएफसीदेखील भारतात ट्रोल झाली आहे. लोकांनी संताप व्यक्त करत #BoycottKFC हॅशटॅग ट्रेंड केला.
या साऱ्य़ा प्रकारानंतर केएफसीने माफी मागितली असून पाकिस्तानातील आमच्या कंपनीच्या देशाबाहेरील काही सोशल मीडिया चॅनलवर पोस्ट केलेल्या पोस्टवर आम्ही माफी मागतो. आम्ही भारताचा सन्मान करतो आणि भारतीयांची सेवा करण्यास प्रतिबद्ध आहोत, असे म्हटले.
अनेकांनी केएफसीला आता बोऱ्या बिस्तरा गुंडाळा आणि निघा, असे सुनावले होते. काश्मीर सोलिडेटरी डेवर पाकिस्तानी केएफसीने आम्ही काश्मीरींसोबत असल्याचा फोटो पोस्ट केला होता.
We deeply apologize for a post that was published on some KFC social media channels outside the country. We honour and respect India, and remain steadfast in our commitment to serving all Indians with pride.
— KFC India (@KFC_India) February 7, 2022
ह्युंदाईने माफीदेखील मागितली नाही...
भारतात गेल्या दोन दशकांपासून दुसऱ्या क्रमांकाची मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनलेली ह्युंदाई आज भारतात जबरदस्त ट्रोल झाली. पाकिस्तानातून एक ट्विट करण्यात आले होते. यामध्ये ह्युंदाई काश्मीरबाबत पाकिस्तानचे समर्थन करत असल्याचे म्हटले होते. हे ट्विट Hyndai Pakistan च्या ट्विटर हँडलद्वारे करण्यात आले होते. काश्मीरी बंधू आणि त्यांच्या बलिदानाचे समर्थन करुया, कारण ते स्वातंत्र्यासाठी लढत राहिले, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. याचसोबत #HyundaiPakistanआणि #KashmirSolidarityDay हा हॅशटॅग देण्यात आला. यावर ह्युंदाईने माफी मागितली नाही, केवळ भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले.