अरेरे! गुपचूप गर्लफ्रेंडला भेटायला आला पण रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी थेट लग्नच लावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:26 PM2024-01-16T12:26:55+5:302024-01-16T12:27:59+5:30

एक तरुण गुपचूप गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता. मात्र गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी त्याला रंगेहाथ पकडलं. या दोघांनाही पकडल्यानंतर कुटुंबाने असं काही केलं ज्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

boyfriend caught red handed in girlfriend home family members got wedding done sambhal | अरेरे! गुपचूप गर्लफ्रेंडला भेटायला आला पण रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी थेट लग्नच लावलं

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात एक तरुण गुपचूप आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता. मात्र गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी त्याला रंगेहाथ पकडलं. या दोघांनाही पकडल्यानंतर कुटुंबाने असं काही केलं ज्याची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. तरुणीच्या घरच्यांनी दोघांना पकडून त्यांचं लग्न लावून दिलं.

कपलला रंगेहाथ पकडल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावून पंचायत बोलावली. पंचायतीमध्ये निर्णय झाल्यानंतर गावच्या काही महत्त्वाच्या लोकांना बोलावून विवाह पार पडला. रात्री एकमेकांना हार घालून लग्नाच्या विधी पूर्ण झाल्या. 

रजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरोरा गावात राहणारा हा तरुण सोमवारी जुनावई पोलीस स्टेशन हद्दीतील खेरिया उत्तम गावात आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी पोहोचला होता. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी तिला मुलासह घरातच पकडलं आणि एकच गोंधळ झाला.

या प्रकरणाची माहिती गावकऱ्यांना मिळताच आजूबाजूचे लोकही जमा झाले आणि घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तरुणावर कारवाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याची चर्चा होती. मात्र गावकऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलवा असं सांगितलं.

त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या बाजूच्या काही लोकांना बोलावलं आणि त्यानंतर अनेक तास दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली. जिथे पंचायतीमध्ये निर्णय झाल्यानंतर रात्री मुला-मुलीचे लग्न लावून देण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 

Web Title: boyfriend caught red handed in girlfriend home family members got wedding done sambhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.