प्रियकराने प्रेयसीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल, तिच्या नातेवाईकांनी बेदम मारले, नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 21:37 IST2025-03-16T21:37:07+5:302025-03-16T21:37:24+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने त्याच्या प्रेयसीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. बघता बघता बघता हे फोटे सदर तरुणीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले.

प्रियकराने प्रेयसीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल, तिच्या नातेवाईकांनी बेदम मारले, नंतर...
उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने त्याच्या प्रेयसीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. बघता बघता बघता हे फोटे सदर तरुणीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले. तेव्हा त्यानंतर या तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपी तरुणाचं गाव गाठलं. तसेच त्याला पकडून बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले.
ही घटना झाशीमधील मोंठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. या गावातील एका मुलीची मैत्री झाशीमधील राजवेंद्र याच्याशी झाली होती. ही मैत्री हळूहळू प्रेमसंबंधांमध्ये बदलली. या दरम्यान, आरोपीच्या हाती सदर तरुणीचे अश्लील फोटो लागले. ते त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले. जेव्हा हे फोटो तरुणीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांना धक्का बसला.
यादरम्यान, रविवारी जेव्हा हा तरुण गावात आला. तेव्हा याची कुणकुण पीडित तरुणीच्या नातेवाईकांना लागली. त्यांनी त्याला त्वरित पकडले. तसेच रागाच्या भारात त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर या तरुणाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. तसेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.