धक्कादायक! मध्यरात्री प्रेयसीला गुपचूप भेटायला घरी गेला तरुण; गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 12:41 IST2023-09-03T12:39:21+5:302023-09-03T12:41:16+5:30
मध्यरात्री गावातील सर्व लोक झोपलेले असताना तो गुपचूप आपल्या प्रेयसीला भेटायला जायचा.

फोटो - news18 hindi
बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे, जिथे प्रेमप्रकरणातून मध्यरात्री घरात आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी पकडून ओलीस ठेवले आणि बेदम मारहाण केली. याच दरम्यान, कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हे प्रकरण गोपालगंज जिल्ह्यातील मांझा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलवारिया गावातले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गावातील लोकांनी प्रियकराचे हातपाय बांधून ओलीस ठेवले असून, त्याला मारहाण केली जात आहे. रात्रभर मारहाण केल्यानंतर सकाळी ग्रामस्थांनी आरोपी तरुणाला सोडून दिले. या तरुणाचे गावातीलच एका तरुणीवर प्रेम असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्यरात्री गावातील सर्व लोक झोपलेले असताना तो गुपचूप आपल्या प्रेयसीला भेटायला जायचा. मात्र यावेळी गावकऱ्यांनी प्रियकराला मुलीच्या घरात घुसून ओलीस ठेवले. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे एसपी स्वर्णा प्रभात यांनी सांगितले.
याप्रकरणी तक्रार आल्यास पोलीस पुढील कारवाई करतील. तर दुसरीकडे प्रियकराला ओलीस ठेवून मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाच्या कुटुंबीयांना यामुळे धक्का बसला आहे. याबाबत लोकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.