प्रेयसीला भेटण्यासाठी १७ किलोमीटरवरून सायकल चालवत यायचा प्रियकर, अखेर गावकऱ्यांनी पकडले आणि लग्न लावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 05:41 PM2021-09-24T17:41:14+5:302021-09-24T17:41:42+5:30

Marriage News: बिहारमधील रामनगर ठाणे क्षेत्रातील एक अजब प्रेमकहाणी आणि त्यानंतर झालेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रेमकहाणीमधील नायक हा दररोज १७ किमी सायकल चालवून प्रेयसीला भेटण्यासाठी येत असे.

The boyfriend, who used to ride a bicycle for 17 km to meet his girlfriend, was finally caught by the villagers and got married. | प्रेयसीला भेटण्यासाठी १७ किलोमीटरवरून सायकल चालवत यायचा प्रियकर, अखेर गावकऱ्यांनी पकडले आणि लग्न लावले 

प्रेयसीला भेटण्यासाठी १७ किलोमीटरवरून सायकल चालवत यायचा प्रियकर, अखेर गावकऱ्यांनी पकडले आणि लग्न लावले 

googlenewsNext

पाटणा - बिहारमधील रामनगर ठाणे क्षेत्रातील एक अजब प्रेमकहाणी आणि त्यानंतर झालेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रेमकहाणीमधील नायक हा दररोज १७ किमी सायकल चालवून प्रेयसीला भेटण्यासाठी येत असे. या लव्हस्टोरीमध्ये ट्विस्टही होता. घरच्यांकडून होणारा विरोधही होता. या प्रेमप्रकरणावरून पंचायतही बसली. मात्र एवढे करूनही जेव्हा हे दोघे वेगळे झाले नाहीत. तेव्हा अखेर गावकऱ्यांनी या दोघांचे लग्न लावून टाकले. ही घटना रामनगर ठाणे क्षेत्रातील सपही पंचायतीच्या सपही भावलगोल बाजार येथे घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या प्रेमकहाणीची सुरुवात ही तीन वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हा एका विवाह सोहळ्यामध्ये बबलू कुमार नावाचा तरुण मंजू कुमारी नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडला. त्यावेळी या तरुणीचे वय १७ वर्षे तर तरुणाचे वय १८ वर्षे होते. सुरुवातीला दोघे मोबाईलवरून बोलू लागले. यादरम्यान, त्यांचे प्रेमसंबंध एवढे दृढ झाले की, त्यांनी एकमेकांसोबत जगण्यामरण्याची शपथ घेतली.

मोबाईलवरून बोलता बोलता हे दोघेही जवळ आले. तसेच गावाजवळ एकमेकांना भेटू लागले. दोघांच्याही घरांमधील अंतर १७ किमी आहे. या प्रेयसीला भेटण्यासाठी हा प्रियकर मग दररोज १७ किमी सायकल चालवून तिच्या घराजवळ येऊ लागला. ही बाब जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना समजली तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. गावातील लोकांनी आणि मुलीच्या कुटुंबीयांनी  या तरुणाला एकदा पकडून समज देऊन सोडून दिले. मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरूच राहिला.

मुलगी आणि मुलाचे कुटुंबीय या विवाहावरून आमने-सामने आले. दोन्हीकडून कोर्टकचेरीची मालिका सुरू झाली. पोलिसांत अर्ज दिले गेले. मात्र सदर मुलगा आणि मुलगी मात्र विवाह करण्यावर ठाम होते. त्यामुळे अनेकदा पंचायतही बोलावली गेली. या पंचायतीमध्येही दोघांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. त्यानंतर गावातील लोकांनी दोन्ही कुटुंबांमध्ये हस्तक्षेप केला. तसेच दोन्ही कुटुंबांची समजूत काढल्यानंतर गुरुवारी रात्री या प्रेमी युगुलाचा खटोरी शिवमंदिरामध्ये विवाह लावून देण्यात आला.  

Web Title: The boyfriend, who used to ride a bicycle for 17 km to meet his girlfriend, was finally caught by the villagers and got married.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.