शाब्बास पोरी! वडिलांनी कांदे-बटाटे विकून कष्टाने शिकवलं; आता लेक झाली मोठी अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 11:35 AM2023-01-02T11:35:57+5:302023-01-02T11:40:26+5:30
जुही कुमारीचे वडील कांदे आणि बटाटे विकतात. बटाटे-कांदे विकून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या धाकट्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा प्रयत्न करत होते.
एखादे ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा असेल आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले तर तुम्ही त्यात नक्कीच यश मिळवू शकता. असे अनेक लोक आहेत ज्यांनी सुविधा नसतानाही यश मिळवले आहे, अशाच एका महिलेबद्दल जाणून घेऊया जिने अडचणींशी लढा देऊन आरडीओ पद मिळवले. बिहार लोकसेवा आयोगाने BPSC च्या 66 व्या एकत्रित स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर केला. निकालानंतर बिहारला मुलींसह अनेक टॉपर्स मिळाले. पण या टॉपर्सपैकी एक, जुही कुमारीसाठी, हे यश खूप खास आहे आणि इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीपीएससीच्या निकालामुळे बिहारमधील सारण जिल्ह्यातील मधुरा खुर्द येथील रहिवासी जुहीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. जुहीला 307 वी रँक मिळाली आहे आणि ती आता आरडीओ म्हणजेच ग्रामीण विकास अधिकारी बनली आहे. हा निकाल जाहीर झाल्यापासून कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. जुही कुटुंबात सर्वात लहान आहे. तिला दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ आहे.
मुलीच्या यशाचा अभिमान
जुही कुमारीचे वडील कांदे आणि बटाटे विकतात. बटाटे-कांदे विकून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या धाकट्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा प्रयत्न करत होते. त्याचबरोबर मुलीला प्रत्येक पाऊलावर आधार देऊन ते प्रोत्साहन देत आहेत. मीडियाशी बोलताना जुहीच्या वडिलांनी सांगितले की, मला मुलीच्या यशाचा अभिमान आहे. त्यांनी सांगितले की, जुहीने मधौरामध्ये राहून इंटरमिडिएटपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी छपरा येथून ग्रॅज्युएशन केलं.
जुहीला दोनदा अपयश आलं आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं
जुहीने सांगितले की, ती यापूर्वी दोनदा मुख्य परीक्षेत नापास झाली होती, पण हिंमत हरली नाही. त्यानंतर चांगले दिवस आले. तिला तिसर्या प्रयत्नात यश तर मिळालेच पण 307 वी रँकही मिळाली. जुहीची बिहार सरकारमध्ये ग्रामीण विकास अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. BPAC ने निकालाच्या अधिसूचनेत माहिती दिली होती की एकूण 1,768 उमेदवार या व्हिवा-व्होस चाचणी/मुलाखतीमध्ये उपस्थित होते, तर 70 गैरहजर राहिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"