बहुजन महासंघाला ब्रोशानंदाचे आशीर्वाद
By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:49+5:302015-05-05T01:21:49+5:30
सावर्डे : गोमंतकात बहुजन महासंघ स्थापन केल्याची वार्ता ही आपणास अत्यंत आनंददायी व समाधानकारक असून आपण या महासंघाच्या पाठीशी सदैव सक्रीयपणे राहीन व आपले आशीर्वाद या महासंघाला मिळत राहील असे प्रतिपादन कुंडई येथील तपोभूमीचे मठाधीश प.पू. ब्रोशानंद स्वामी यांनी केले.
Next
स वर्डे : गोमंतकात बहुजन महासंघ स्थापन केल्याची वार्ता ही आपणास अत्यंत आनंददायी व समाधानकारक असून आपण या महासंघाच्या पाठीशी सदैव सक्रीयपणे राहीन व आपले आशीर्वाद या महासंघाला मिळत राहील असे प्रतिपादन कुंडई येथील तपोभूमीचे मठाधीश प.पू. ब्रोशानंद स्वामी यांनी केले. गोमंतक बहुजन महासंघाचे प्रतिनिधी त्यांना महासंघाचे प्रतिनिधी त्यांना महासंघाचे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी खास आमंत्रण देण्यासाठी तपोभूमी येथे जाऊन त्यांची भेट घेतली असता त्यांनी वरील उद्गार काढले. महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे, कार्याध्यक्ष प्रकाश वेळीप, पदाधिकारी विष्णू बांदेकर, आनंद मंगेश नाईक, दत्तात्रय च्यारी, सोमनाथ च्यारी यांनी तपोभूमीवर जावून स्वामीजींची भेट घेतली. त्याचा २० मे ते २७ मे पर्यंत गोव्याबाहेर दौरा या अगोदरच निश्चित झालेला असूनही स्वामीजींनी आपण गोव्यात एवढी मोठी गोष्ट घडत असताना आपण त्यात सहभागी न होणे हे ईश्वरालाही मान्य नसून आपण दौर्यातून एक दिवस वेळ काढून या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. आपण गेल्या वर्षी २०१४ ला अशा प्रकारचा महासंघ स्थापन करण्याची तयारी केली होती. परंतु त्यावर्षी १५० विविध भागातील धर्मगुरूंची तपोभूमीत उपस्थित कायक्रम झाल्याने आपण त्यावेळी तो बेत रद्द केला होता. मात्र हाच उपक्रम आता पूर्णत्वास आल्याने आपणास अतिशय आनंद झाला आहे असे सांगून या महासंघाने गोव्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. या महासंघाने शिक्षण, रोजगार, हॉस्पिटल, पुस्तकपेढी अशा विविध योजना राबवून अडलेल्या नडलेल्यांना मदत करावी त्यांच्या सुख-दु:खात सामील व्हावे, अशीही सूचना केली. महासंघातर्फे तपोभूमीत कोणतेही कार्यक्रम करण्याची इच्छा असल्यास हा परिसर केव्हाही उपलब्ध असेल असेही स्पष्ट केले व या महासंघाला आपले पूर्ण आशीर्वाद असेल, असे सांगितले. (लो.प्र.)