तामिळनाडूतील मंदिरात पहिल्यांदाच ब्राह्मणेतर पुजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:47 AM2018-08-06T03:47:37+5:302018-08-06T03:47:41+5:30
तामिळनाडू सरकारने पहिल्यांदाच एखाद्या मंदिरात ब्राह्मणेतर समाजातील पुजाऱ्याची नियुक्ती केली आहे.
Next
मदुराई : तामिळनाडू सरकारने पहिल्यांदाच एखाद्या मंदिरात ब्राह्मणेतर समाजातील पुजाऱ्याची नियुक्ती केली आहे. हा मान तल्लाकुलम येथील अयप्पा मंदिरातील पुजारी टी. मरिचामी यांना मिळाला आहे.
राज्यातील महत्त्वाच्या शैव व वैष्णवपंथीय मंदिरांमध्ये सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा निर्णय एम. करुणानिधी सरकारने घेतला होता. त्यानूसार २००७-०८ या कालावधीत ब्राह्मणेतर समाजातील २०६ जणांना पौरोहित्याचे रितसर शिक्षण देण्यात आले. मात्र याविरोधात टीकेचा सूर उमटल्यानंतर ही योजनाच बंद करण्यात आली तसेच त्यात पौरोहित्याचे शिक्षण घेतलेल्यांची त्यानंतर १० वर्षे कोणत्याही मंदिरात नियुक्ती करण्यात आली नव्हती.