सामाजिक सलोख्याचं दर्शन; मशिदीसाठी ब्राह्मणांकडून जमिनीचं दान, शिखांनीही उभारला निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 02:08 PM2018-02-27T14:08:29+5:302018-02-27T14:08:29+5:30

मशिदीच्या बांधकामासाठी स्थानिक ब्राम्हणांनी आपली जमीन देत सर्वांसमोर हिंदू - मुस्लिम एकतेचं उदाहरण ठेवलं आहे

brahmins donate land for Masjid | सामाजिक सलोख्याचं दर्शन; मशिदीसाठी ब्राह्मणांकडून जमिनीचं दान, शिखांनीही उभारला निधी

सामाजिक सलोख्याचं दर्शन; मशिदीसाठी ब्राह्मणांकडून जमिनीचं दान, शिखांनीही उभारला निधी

Next

बरनाला - पंजाबमधील बरनाला जिल्ह्यात धार्मिक एकतेचं उदाहरण पहायला मिळालं आहे. मशिदीच्या बांधकामासाठी स्थानिक ब्राम्हणांनी आपली जमीन देत सर्वांसमोर हिंदू - मुस्लिम एकतेचं उदाहरण ठेवलं आहे. मूम गावातील ही घटना आहे. इतकंच नाही तर मशिदीच्या बांधकामासाठी लागणारा निधी शिखांनी गोळा करुन दिला. मशिद उभारण्यासाठी इतर दोन धर्मातील लोकांनीही पुढाकार घेतला आहे. 

लुधियाना जिल्ह्याला लागून असणा-या गावात या मशिदीचं काम सुरु असून जसवीर खान यांचा भाऊ नजीम खान याच्यावर देखभालीची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितलं आहे की, 'आम्ही गावात आतापर्यंत दोन खोल्यांच्या बाबा मोमीन शाह यांच्या दर्ग्यात नमाज पठण करायचो. गावातील ब्राम्हणांनी आम्हाला जमीन दान केली, ज्यानंतर आम्ही बांधकाम सुरु केलं. त्यांनी फक्त जमीनच दिली नाही तर बांधकामासाठी आम्हाला मदतही करत आहेत. त्यांनी आमच्यासाठी निधीही गोळा करत आहेत'.

शीख समाजाचाही पुढाकार
नजीम खान सांगतात की, 'ज्याप्रकारे गावातील लोक आणि आमचे शीख बंधू मशिद उभारण्यासाठी आम्हाला मदत करत आहेत ते पाहता लवकरच काम पूर्ण होईल'.

एकाच गावात मंदिर, मशिद आणि गुरुद्वारा
मशिदीच्या बांधकामात महत्वाची भूमिका निभावणारे आणि आयुर्वेदाशी संबंधित व्यवसायाशी जोडले गेलेले पंडित पुरुषोत्तम लाल यांनी आम्ही आपलं कर्तव्य निभावलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही गावात एक शिवमंदिर उभं करत आहोत. आमच्या गावात गुरुद्वाराही आहे. त्यामुळे गावात एक मशिद असावी अशी आमची इच्छा होती. सर्व धर्मांचा योग्य आदर राखला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं. लहानपणापासून आम्हाला सर्वांचा सन्मान करण्याची शिकवण मिळाली आहे. धर्मनिरपेक्ष असल्याचा आम्हाला गर्व आहे'. 

या गावात जवळपास शीख समाजाची लोकसंख्या चार हजार आहे. तर मुस्लिम आणि हिंदूंची लोकसंख्या 400 च्या आसपास आहे. हे गाव सामाजिक एकतेचं उदाहरण असल्याचं सरपंच मनजीत कौर सांगतात. 
 

Web Title: brahmins donate land for Masjid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.