सुखोई विमानांवरून पहिल्यांदाच होणार ब्राह्मोसची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 10:41 AM2017-11-14T10:41:48+5:302017-11-14T10:45:49+5:30

शत्रूराष्ट्राच्या हद्दीत जाऊन विध्वंस घडवण्याची ब्राह्मोसची क्षमता सर्वश्रुत आहे. त्याबरोबरच अत्याधुनिक सुखोई विमाने ही भारताच्या हवाई ताफ्यामधील महत्त्वाचे अस्र आहेत.

BrahMos test for the first time from the Sukhoi flight | सुखोई विमानांवरून पहिल्यांदाच होणार ब्राह्मोसची चाचणी

सुखोई विमानांवरून पहिल्यांदाच होणार ब्राह्मोसची चाचणी

Next

नवी दिल्ली - शत्रूराष्ट्राच्या हद्दीत जाऊन विध्वंस घडवण्याची ब्राह्मोसची क्षमता सर्वश्रुत आहे. त्याबरोबरच अत्याधुनिक सुखोई विमाने ही भारताच्या हवाई ताफ्यामधील महत्त्वाचे अस्र आहेत. आता सुखोई विमानाची हल्ला करण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुखोईच्या शस्त्रसाठ्यात ब्राह्मोस क्षेपणास्त्र जोडून शत्रूवर डबल अटॅक करण्याची तयारी संरक्षण यंत्रणांनी केली आहे. त्यानुसार पहिल्यांदाच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई विमानांवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात येणार आहे. 
आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची या आठवड्यात पहिल्यांदाच सुखोई एमकेआय- 30 फायटर विमानावरून चाचणी होणार आहे. लढाऊ विमानावरून हल्ला करण्यास सक्षम असलेले ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि सुखोई एमेआय फायटर जेटच्या या कॉम्बिनेशनकडे डेडल कॉम्बिनेशन म्हणून पाहिले जात आहे. हवेतून जमिनीवर मारा करता येणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा शत्रू सैन्याच्या सीमेवरील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी वापर करता येऊ शकेल. 
ब्राह्मोस क्षेपणास्र भूमिगत परमाणू बंकर, कमांड आणि नियंत्रण कक्ष तसेच समुद्रावरून उडणारी विमाने यांना लक्ष्य करता येऊ शकेल. गेल्या दशकात लष्कराने 290 किमी पर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राला आपल्या ताफ्यात सामील केले होते. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी 27 हजार 150 कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच लष्कर, नौदल, आणि हवाई दलाने या क्षेपणास्त्रांबाबत रस दाखवला आहे.   
जून 2016 मध्ये भारत 34 देशांची संघटना असलेल्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिझिम या संघटनेचा सदस्य बनल्यापासून क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेवरील निर्बंध उठले आहे.  त्यामुळे सुरक्षा दले आता ब्राह्मोसच्या 450 किमीपर्यंत मारक क्षमता असलेल्या आवृत्तीची चाचणी करण्याच्या तयारीत आहेत. 
एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाल्यानंतर भारत 300 किमी मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यास सक्षम होईल. सध्यातरी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे हायपरसोनिक व्हर्जन तयार कण्याची तयारी सुरू आहे. हे क्षेपणास्त्र माक 5 (ध्वनीच्या पाच पट वेगाने) वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असेल.  

Web Title: BrahMos test for the first time from the Sukhoi flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत