मेंदूविकार तज्ज्ञ किनगे दर बुधवार, गुरुवारी उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध
By admin | Published: March 29, 2016 12:25 AM2016-03-29T00:25:43+5:302016-03-29T00:25:43+5:30
जळगाव : मेंदू व नसांचे विकार तज्ज्ञ डॉ.नीलेश किनगे हे आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात आठवड्यातील प्रत्येक बुधवार व गुरुवारी रुग्णांसाठी सकाळी १० ते १ या वेळेत उपलब्ध राहणार आहे.
Next
ज गाव : मेंदू व नसांचे विकार तज्ज्ञ डॉ.नीलेश किनगे हे आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात आठवड्यातील प्रत्येक बुधवार व गुरुवारी रुग्णांसाठी सकाळी १० ते १ या वेळेत उपलब्ध राहणार आहे.उत्तर महाराष्ट्रात प्रथमच मेंदूच्या नसेची एन्जीओप्लास्टी व पॅरालेसिसवर आधुनिक पद्धतीची शस्त्रक्रिया, मेंदूच्या फुगलेल्या नसांची शस्त्रक्रिया, नसांच्या गुतांची शस्त्रक्रिया करणारे डॉ.नीलेश किनगे हे हेडेक व स्ट्रोक स्पेशालिस्ट व इण्टरवेशनल न्युरोलॉजिस्ट आहे. डॉ.नीलेश किनगे मेंदूची एन्जीओग्राफी, मेंदूच्या नसेची एन्जीओप्लास्टी, लकवा, पॅरालेसीसवर आधुनिक शस्त्रक्रिया, मेंदूतील फुगलेल्या नसांवरची शस्त्रक्रिया करण्यात डॉ.किनगे यांचा हातखंडा आहे. डॉ.किनगे यांनी नागपूर येथील एमबीबीएस व अमृतसर जीएमसी येथून एमडीचे शिक्षण पूर्ण केले आहे. फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड व मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय आणि जी.बी.पंत हॉस्पिटल दिल्ली येथे त्यांनी मायग्रेन, नसांचे विकार, मिरगी, मानसिक न्युरोविकार, तसेच संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टट्यिूट ऑफ मेडिकल सायन्सेस लखनऊ येथून त्यांनी डीएम न्युरोलॉजीचे शिक्षण पूर्ण केले आहे. बंगळूरूच्या निहान संस्था व औरंगाबादच्या नंदलाल धूत रुग्णालयातही त्यांनी सेवा बजावली आहे. यु.एस.ए. स्वीर्त्झलँडला जाऊन त्यांनी इण्टर वेन्शनल न्युरोलॉजी ॲण्ड स्ट्रोक यामध्ये फेलोशीप मिळवली आहे. त्यांचा राजस्थान येथील मेंदू व नसाच्या शस्त्रक्रियेवर अनुभव व त्यातील एफआयएनएस ही पदवीदेखील मिळवली आहे. मेंदू व नसांचे विकार तज्ज्ञ डॉ.नीलेश किनगे यांची आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातही रुग्णांसाठी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आठवड्यातील प्रत्येक बुधवार आणि गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मेंदू व नसांच्या विकार रुग्णांसाठी डॉ.किनगे हे डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सेवा देणार आहे. तरी रुग्णांनी त्यांच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.