ब्रम्हपुत्र पुलाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण
By admin | Published: May 26, 2017 11:06 AM2017-05-26T11:06:02+5:302017-05-26T11:56:02+5:30
आसाममध्ये ब्रम्हपुत्रेच्या उपनदीवर तब्बल 9.15 किमीचा विस्तीर्ण पूल बांधला गेला आहे. आज म्हणजे 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या पूलाचं लोकार्पण करण्यात आलं.
Next
ऑनलाइन लोकमत
दिसपूर, दि. 26- आसाममध्ये ब्रम्हपुत्रेच्या उपनदीवर तब्बल 9.15 किमीचा विस्तीर्ण पूल बांधला गेला आहे. आज म्हणजे 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या पूलाचं लोकार्पण करण्यात आलं. सदिया आणि ढोला या दोन भागांना जोडणाऱ्या या पुलाला ब्रम्हपुत्र असं नाव देण्यात आलं आहे. आसाममधल्या ढोला आणि अरुणाचलमधल्या सदिया यांना जोडणारा हा पूल पूर्वोत्तर राज्यांसाठी दळणवळण क्रांती ठरणार असल्याचं सांगितलं जातं आहे. सध्या या दोन ठिकाणांचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 6 तासांचा प्रवास करावा लागतो तो आता फक्त 1 तासावर येणार आहे. शिवाय 165 किमीचं अंतरही वाचणार आहे. ज्यामुळे दिवसाला 10 लाख रुपयांचं इंधन वाचेल असा दावा सरकार करतं आहे. चीन सीमेवर तातडीनं हालचाली करण्यासाठी, अवजड टँक आणि इतर शस्रांची जलदगतीनं वाहतूक करण्यासाठी हा पूल फायद्याचा ठरणार आहे. या ठिकाणी तैनात असलेल्या लष्करी तुकडीला आसामच्या ढोलामधून अरुणाचलला जायचं असलं की नौकेतून प्रवास करण्यासाठी तासनतास घालवावे लागत. सोबत अवजड वाहन असल्यास 250 किमी वळसा घालत 10 तासांचा प्रवास करावा लागायचा. पण या पूलामुळे पूर्वोत्तर सीमेवर लष्कराला अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे.
ब्रम्हपुत्र पुलाची वैशिष्ट्यं
- ढोला-सदिया ब्रम्हपुत्र पुलाची लांबी 9.15 किलोमीटर आहे.
- ब्रम्हपुत्र पुल वांद्रे-वरळी सी-लिंकपेक्षा 30 टक्के मोठा आहे.
- आसामची राजधानी दिसपुरपासून 540 किमी आणि अरूणाचलची राजधानी ईटानगरपासून 300 किमी लांब आहे.
- महत्त्वाचं म्हणजे चीनचं एरियल डिस्टंस 100 किमीपेक्षा कमी आहे.
- तेजपुर जवळ असलेल्या कलाईभोमोरा पुल नंतर ब्रम्हपुत्रवर पुढच्या 375 किमी ढोलापर्यंत दूसरा पुल नाही आहे.
- आत्तापर्यंत नदीच्या मार्गाने प्रवास करण्यासाठी होडीचा वापर करावा लागत होता.
- ब्रम्हपुत्र पुल बनवायचं काम 2011मध्ये सुरू झालं होतं, तर पुलासाठी एकुण 950 करोड खर्च झाला आहे.
- एकुण 182 खाबांवर हा पुल उभा आहे.
- आसाम आणि अरूणाचल या दोन राज्यांना हा पूल जोडेल.
- लोकांना प्रवास करण्यासाठी तसंच लष्कराला या पुलाचा खूप फायदा होणार आहे.
- चीन सीमेपर्यंत प्रवास करण्यासाठी चार तासांचं अंतर कमी होणार आहे.