‘बेवकूफ’ नावाच्या हॉटेलचे गिरिदीहमध्ये झाले ब्रँडनेम
By admin | Published: April 15, 2017 01:20 AM2017-04-15T01:20:58+5:302017-04-15T01:20:58+5:30
आपल्याला कोणी मुर्ख (बेवकूफ) म्हटले तर आपल्याला राग येणे साहजिकच आहे परंतु तुम्हाला हे वाचून धक्का बसावा की झारखंड राज्यातील गिरिदीहमध्ये ‘बेवकूफ’
गिरिदीह (झारखंड) : आपल्याला कोणी मुर्ख (बेवकूफ) म्हटले तर आपल्याला राग येणे साहजिकच आहे परंतु तुम्हाला हे वाचून धक्का बसावा की झारखंड राज्यातील गिरिदीहमध्ये ‘बेवकूफ’ या नावाने एकच नव्हे तर अनेक हॉटेल्स आहेत. गिरिदीहमध्ये ४७ वर्षांपूर्वी (७० च्या दशकात) पहिले बेवकूफ नावाचे हॉटेल सुरू झाले.
या नावाचे हॉटेल का सुरू झाले हे मोठे रंजक आहे.गोपीराम नावाच्या व्यक्तिने गिरिदीहमध्ये पदपथावर हॉटेल सुरू केले होते. तेथे ४० पैशांत वरण,भात, पोळी, भाजीचे जेवण मिळायचे. तेव्हा गोपीरामच्या या हॉटेलची काही तेवढी ख्याती नव्हती. सरकारी कार्यालयाजवळ गोपीरामचे हे हॉटेल असल्यामुळे दुपारी तेथे जेवायला जाणाऱ्यांची गर्दी असायची. या गर्दीचा काही लबाड लाभ घेत पैसे न देताच निघून जायचे व बाहेर गोपीरामची थट्टा उडवायचे व म्हणायचे की,‘तो (गोपीराम) तर मुर्ख (बेवकूफ) लोकांकडून पैसेच घेत नाही.’ एके दिवशी गोपीरामला हे समजले व त्याने हॉटेलबाहेर ‘बेवकूफ हॉटेल’ अशी पाटीच लावली. हे जगावेगळे नाव वाचून लोक या हॉटेलमध्ये येऊ लागले. व बघताबघता ते प्रसिद्ध झाले व आता तर ते बँ्रडनेम झाले आहे. लोक आता आपल्या हॉटेलचेही नाव बेवकूफ नावाशी मिळते जुळते ठेवत आहेत. सोशल मिडियावरदेखील हॉटेल बेवकूफचे साईनबोर्ड (पाट्या) नेहमीच व्हायरल होतात त्यामुळे देशाच्या इतर भागांतही बेवकूफ हॉटेलची
चर्चा होते.