पितळी भांड्यांची चोरी
By Admin | Published: November 29, 2015 11:57 PM2015-11-29T23:57:11+5:302015-11-29T23:57:11+5:30
अहमदनगर : कल्याण रोडवरील शंकर वैंकय्या शिरसूल यांच्या घरातून १५ हजार ५०० रुपये किंमतीची पितळी आणि स्टिलची भांडी चोरीला गेली आहेत. ही घटना दोन महिन्यांपासून ते २८ नोव्हेंबर या कालावधीत घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घराच्या खिडकीतून प्रवेश करून अज्ञातांनी ही चोरी केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अ मदनगर : कल्याण रोडवरील शंकर वैंकय्या शिरसूल यांच्या घरातून १५ हजार ५०० रुपये किंमतीची पितळी आणि स्टिलची भांडी चोरीला गेली आहेत. ही घटना दोन महिन्यांपासून ते २८ नोव्हेंबर या कालावधीत घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घराच्या खिडकीतून प्रवेश करून अज्ञातांनी ही चोरी केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.---------------------टेम्पोतील किराणा माल चोरीलाअहमदनगर : हातमपूरा भागातील बाळू तुळशीराम साठे (रा. धरती चौक) यांच्या टेम्पोतील किराणा माल चोरीला गेल्याची घटना २५ नोव्हेंबरला घडली असून या प्रकरणी शनिवारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. साठे यांच्या टेम्पोत शेंगदाण्याचे चार कट्टे, पांढर्या रंगाची कापडाची गाठ असा ५७ हजार रुपये किंमतीचा किरणा माल चोरीला गेला आहे. टेम्पोचा पाठीमागील पडदा फाडून अज्ञात इसमांनी माल चोरी केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.-----बोल्हेगावला मटकाअहमदनगर : एमआयडीसी परिसरातील बोल्हेगाव फाटा येथे कल्याण मटका खेळणार्या अनिल रत्नाकर घोडके याच्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून ४३० रुपये रोख व मटका खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस कर्मचारी योगेश ठाणगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.------------अपघातात एक ठारअहमदनगर : चिचोंडी गाव शिवारात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत काशिनाथ किसन खेडकर (वय ६५, रा. उक्कडगाव, ता. नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता नगर-जामखेड रस्त्यावर चिचोंडी गाव शिवारात घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.