१६ वर्षीय मुलीनं जीवाची बाजी लावली अन् नदीत वाहून जाणाऱ्या आईला वाचवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 09:05 AM2020-06-08T09:05:41+5:302020-06-08T09:17:27+5:30
आईला नदीतून बाहेर काढण्यासाठी तिने जवळपास २० मिनिटे धडपड केली आणि अखेर आईला गंगा नदीतून बाहेर काढले.
जोशीमठ : गंगा नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या आईला वाचविण्यासाठी एका मुलीने आपल्या जीवाची बाजी लागल्याचे समोर आले आहे. आईला नदीतून बाहेर काढण्यासाठी तिने जवळपास २० मिनिटे धडपड केली आणि अखेर आईला गंगा नदीतून बाहेर काढले.
ही घटना रविवारी घडली. नेपाळी वंशाच्या रामकली देवी आणि तिची 16 वर्षांची मुलगी किरण तपोवनमधील धौली गंगा नदीच्या काठावर लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान, रामकली देवी यांचा पाय घसरुन त्या नदीत पडल्या. त्यानंतर किरणनेही आपल्या जीवाची पर्वा न करता गंगेत उडी मारली. आईला वाचविण्याचे किरणने प्रयत्न सुरु केले आणि अखेर तिने आईला वाचविले.
प्रत्यक्षदर्शी ओम प्रकाश डोभाल यांनी सांगितले की, यावेळी किरण सुद्धा नदीत वाहता-वाहता वाचली. मात्र, तिने धाडसाने आईला नदीतून बाहेर काढण्यासाठी जवळपास २० मिनिटे धडपड केली आणि अखेर आईला गंगा नदीतून बाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोक जमा झाले. त्यानंतर जखमी रामकली देवी यांना जोशीमठमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सर्वजण किरणच्या या धाडसाचे कौतुक करत आहेत.