‘सर्जिकल स्ट्राइक’ फत्ते करणाऱ्यांना ‘शौर्य पदके’

By admin | Published: January 26, 2017 05:15 AM2017-01-26T05:15:43+5:302017-01-26T05:15:43+5:30

जम्मू-काश्मीरमधील उरी येथील तळावरील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या १९ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांच्या छावण्या उध्वस्त करण्याच्या

'Brave medal' for those who make 'surgical strike' | ‘सर्जिकल स्ट्राइक’ फत्ते करणाऱ्यांना ‘शौर्य पदके’

‘सर्जिकल स्ट्राइक’ फत्ते करणाऱ्यांना ‘शौर्य पदके’

Next

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील उरी येथील तळावरील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या १९ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांच्या छावण्या उध्वस्त करण्याच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ फत्ते करणाऱ्या लष्करातील अधिकारी आणि जवानांना शौर्य पदके जाहीर करून सरकारने बुधवारी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
सैन्यदलांचे सर्वोच्च सेनानी असलेल्या राष्ट्रपतींतर्फे ही पदके देऊन सैनिकांच्या शौर्याचे कौतुक केले जाते. गेल्या सप्टेंबरमधील ही अत्यंत जोखमीची लष्करी मोहीम निरपवाद अूचकतेने पार पाडून सुखरूपपणे मायदेशी परतलेल्या लष्कराच्या चौथ्या आणि नवव्या छत्रीधारी तुकडीतील १९ बहाद्दर जवांना एका कीर्तिचक्रासह अन्य शौर्र्र्र्यपदके जाहीर झाली आहेत. या तुकड्यांचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘युद्ध सेवा पदक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यापैकी चौथ्या छत्रीधारी तुकडीचे नेतृत्व करणारे मेजर रोहित सुरी यांना ‘कीर्ति चक्र’ हे लष्करी सेवेतील दुसरे सर्वोच्च पदक देण्यात आले आहे. तसेच नवव्या छत्रीधारी तुकडीचे कमांडिंग आॅफिसर कर्नल कपिल यादव व चौथ्या तुकडीचे कमांडिंग आॅफिसर कर्नल हरप्रीत संधू यांना युद्ध सेवा पदक देण्यात येणार आहे. युद्ध सेवा पदक हे शांतता काळातील वैशिष्ठ्यपूर्ण सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या ‘विशिष्ठ सेवा पदका’शी समकक्ष असे युद्धभूमीवरील कामगिरीसाठी दिले जाणारे पदक आहे. छत्रीधारी सैनिकांच्या या दोन तुकड्यांंमधील पाच जवानांना शौर्य पदके तर १३ जवानांना शौर्यासाठीची सेना पदके देण्यात येतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मराठी शूरवीर, परम विशिष्ट सेवापदक : १. लेफ्ट. जन. राजीव कानिटकर, २. लेफ्ट. जन. अशोक शिवणे, ३. लेफ्ट. जन. अविनाश चव्हाण, ४. लेफ्ट. जन. विनोद खंदारे, ५. लेफ्ट. जन. रेमंड जोसेफ नऱ्होना
उत्तम युद्धसेवापदक : १. लेफ्ट. जन. राजेंद्र निंभोरकर, अतिविशिष्ट सेवापदक (दुसऱ्यांदा), १. लेफ्ट. जन. अशोक आंब्रे
अतिविशिष्ट सेवापदक : १. लेफ्ट. जन. मनोज नरवणे, २. लेफ्ट. जन. ख्रिस्तोफर फर्नांडिस
शौर्यचक्र : १. हवालदार पांडुरंग महादेव गावडे (मरणोत्तर)
युद्धसेवा पदक : १. कर्नल अमिताभ वालावलकर
सेना पदक : १. कर्नल रणजीतसिंग पवार (मरणोत्तर)
२. मेजर राघवेंद्र येंदे, ३. मेजर हृषिकेश बर्डे, ४. कॅप्टन मानस जोंधळे, ५. सुबेदार सुनील नामदेव पाटील
विशिष्ट सेवा पदक : १. ब्रिगेडियर अतुल कोतवाल, २. कर्नल धनंजय भोसले, ३. लेफ्ट. कर्नल समीर पर्वतीकर
सेनापदक (दुसऱ्यांदा) : १. कर्नल अनिलकुमार जोशी, सेनापदक (उल्लेखनीय) : १. ब्रिगेडियर एस. डी. मुळगुंद
विविष्ट सेवापदक : १. मेजर जन. मिलिंद ठाकूर
गौरवपूर्ण उल्लेख : १. मेजर नितीन भिकाणे (आॅपरेशन मेघदूत), २. लेफ्ट. कर्नल राजेश हंकारे (आॅपरेशन रक्षक), ३. मेजर हर्षल कचरे (आॅपरेशन रक्षक), ४. मेजर सुमीत जोशी (आॅपरेशन रक्षक), ५. एसपीआर अभय हरिभाऊ पगार (आॅपरेशन रक्षक)

Web Title: 'Brave medal' for those who make 'surgical strike'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.