शाब्बास पोरी! जखमी झाली तरी नेटाने लढली, 15 वर्षीय मुलीने चोरांना चांगलीच अद्दल घडवली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 12:30 PM2020-09-02T12:30:36+5:302020-09-02T12:43:50+5:30
चोरट्यांशी लढतानाची संपुर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच सोशल मीडियावरही याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
चंदीगड - चोरीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना पंजाबच्या जालंधरमध्ये घडली आहे. एका 15 वर्षीय मुलीच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरांना मुलीने चांगलीच अद्दल घडवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसुम कुमारी असं या धाडसी मुलीचं नाव असून ती रस्ताने जात असताना बाईकवरून आलेल्या दोन चोरांनी तिचा मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
कुसुमने न घाबरता चोरांना विरोध केला. मात्र मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनी या दरम्यान तिच्या हातावर वार केले. पण तरीदेखील मुलीने त्यांचा पाठलाग करणं सुरूच ठेवलं. ती यामध्ये जखमी झाली पण नेटाने लढल्याची माहिती मिळत आहे. चोरट्यांशी लढतानाची संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच सोशल मीडियावरही याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
मोबाईल हिसकावणाऱ्या चोराला कुसुमने जोरदार विरोध केला. तसेच त्यांची बाईकही पकडली त्यावेळी एक जण बाईकवरून खाली उतरला आणि त्याने कुसुमला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचे केस धरले. तिच्यावर शस्त्राने वारही केले. मात्र कुसुम मागे हटली नाही. तिने जखमी अवस्थेत पुन्हा चोरांचा पाठलाग केला आणि मदतीसाठी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. कुसुमचा आवाज ऐकून काही लोक तिच्या मदतीसाठी धावून आले.
चोर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यातील एकाला पकडण्यात यश आलं आहे. कुसुमने आपला मोबाईलही परत मिळवला आणि तिच्या या हिमतीमुळे एका चोराला देखील अटक झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. अविनाश कुमार असं या चोराचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. चोरट्यांशी लढताना कुसुमला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ITBP जवानांनी घडवले माणुसकीचे दर्शनhttps://t.co/AlyDYFedKA
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या
कडक सॅल्यूट! 25 किमी तब्बल 8 तास पायी प्रवास करून ITBP जवानांनी कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला मृतदेह
'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध
एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण
CoronaVirus News : कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले...