coronavirus : ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी थेट बजरंगबली हनुमानाशी केली मोदींची तुलना, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 02:19 PM2020-04-08T14:19:10+5:302020-04-08T15:00:21+5:30
सुरुवातीला बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस म्हणेज सामान्य फ्लू असल्याचे म्हटले होते. त्यांनी स्वतःच सोशल डिस्टंसिंगचे उलंघण करत ब्राझीलमध्ये आपल्या समर्थकांची भेट घेऊन अर्थव्यवस्थेला चालणा देण्याची अपील केली होती.
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. बोल्सोनारो यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची तुलना थेट बजरंगबली हनुमान यांच्याशी केली आहे. तर पाठवण्यात आलेले औषध हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनची तुलना संजीवनी औषधी वनस्पतीसोबत (संजीवनी बूटी) केली आहे.
बोल्सोनारो यांचे मोदींना पत्र -
ब्राझीलचे राष्ट्रपती जायर एम. बोल्सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे, की 'भगवान रामचंत्र यांचा भाऊ लक्ष्मण यांचे प्राण वाचवण्यासाठी हिमालयातून औषध (संजिवनी औषधी वनस्पती) घेऊन येणारे भगवान हनुमान आणि रुग्णांना बरे करणारे येशू मसीह यांच्याप्रमाणेच भारत आणि ब्राझील मिळून या वैश्विक संकटाचा सामना करती. ब्राझीलमध्ये बुधवारपर्यंत 14 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लगाण झाल्याचे समते.
बोल्सोनारो म्हणाले होते, कोरोना म्हणजे 'सामान्य फ्लू' -
सुरुवातीला बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस म्हणेज सामान्य फ्लू असल्याचे म्हटले होते. त्यांनी स्वतःच सोशल डिस्टंसिंगचे उलंघण करत ब्राझीलमध्ये आपल्या समर्थकांची भेट घेऊन अर्थव्यवस्थेला चालणा देण्याची अपील केली होती. देशातील विविध प्रांतांचे गव्हर्नर आणि शहराच्या महापौरांनी घोषित केलेल्या क्वारंटाईनवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी बोल्सोनारो म्हणाले होते, 'जर असेच चालू राहिले तर मोठ्या प्रमाणावर बेरोजकारी वाढेल आणि येणाऱ्या काळात आणखी कठीन परिस्थितीचा सामाना करावा लागेल. असे झाले तर ब्राझील व्हेनेझुएला होईल.' आणखी एका पोस्टमध्ये ते म्हणाले होते, काही लोकांना वाटते की मी प्रोटोकॉल्सचे पालन करावे आणि घरातच थांबावे. मात्र, हे जीवन आहे, एकदवस सर्वांनाच जायचे आहे.'
डोनाल्ट्रम यांनी केलो मोदींचे कौतुक -
भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीला मंजूरी दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान मोदी हे महान आणि खूप चांगले नेते आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेत सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. तेथे मंगळवारी एकाच दिवसात २ हजार जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत 30 देशांनी केलीये या औषधाची मागणी -
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे मलेरिया विरोधक ओषध कोरोना व्हायरसच्या रुग्णांवरील उपचारासाठी अत्यंत प्रभावी मानले जात आहे. आतापर्यंत 30 देशांनी भारताकडे या औषधाची मागणी केली आहे.